Photo Credit- Social Media 'हे भाजप चे केवळ दबावतंत्र आहे का?' नारायण राणेंच्या दाव्यावर दमानियांचा थेट सवाल
मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री एक शब्द बोलू शकले नाहीत की हा माणूस मला इथे नको. आम्ही इतके पुरावे दाखवले, तपास यंत्रणांनी तपास केल्यानंतर त्यांच्याकडे इतके पुरावे होते. त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना दाखवले नसतील का, तरीही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचे आदेश का दिले गेले नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यास इतके दिवस का लावले, या राजकारण्यांकडे साधी माणूसकी उरली नाही का, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
अंजली दमानिया म्हणाल्या, आता आमच्याकडून पुराव्यांची गरज ठेवू नका. आम्ही शोधून शोधून तुमच्यासमोर पुरावे मांडतो. ते म्हणतात, पुरावे दाखवल्याशिवाय राजीनामा घेता येणार नाही, मग आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही, अरे तुम्ही काय लॉर्ड आहात का आमचे, तुम्ही लोकप्रतिनीधी आहात, कधीतरी लोकप्रतिनिधींसारखे वागा अजित पवार. तुम्हाला सगळे सांगतायेत, सर्व पुरावे आणून दिले, तरीही तुम्ही राजीनामा घेता येत नाही. बास झालं तुमचं घाणीचं आणि गलिच्छ राजकारण, नकोय आम्हाला हे राजकारण.
Breaking! मुख्यमंत्री फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश
सगळे तसेच आहेत. सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचं आहे. ते लोक येणार पैसे खाणार आणि आपण बघत राहणार. पण आपण काही बोलायचंही नाही यांना. हे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीपण आहेत. पण त्यांना सीआयडीने कसे पुरावे आहेत फोटो आहेत, व्हिडीओ आहेत, हे सांगितलेच नसेल का, तरीही तुम्हाला मुंडेंचा राजीनामा घ्यायला एवढा वेळ लागतो. तरीही त्या वाल्मिक कराडच्या जेलमधला सीसीटिव्ही बंद होता. जेलमध्येही त्याची सरबराई सुरू होती. काय समजता तुम्ही सामान्य माणसाला. आम्हला चिरडून गेल, तरी त्याच्यावर कोणती कारवाई होणार नाही, का, असा संतप्त सवालही अंजली दमानियांनी उपस्थित केला. आता राजीनाम्यावर मला काहीच बोलायचं नाही, आता फक्त या माणसाला उचलून फेकून द्या, असंच मला वाटतंय, असं म्हणत त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
लाठ्या, लाथाबुक्क्या, छातीवर नाचले; संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर
दरम्यान, धनंजय मुंडेंनी राजीनामा न दिल्यास अंजली दमानिया यांचे पुढचे पाऊल काय असेल, असा सवाल विचारला असता दमानिया म्हणाल्या की, विधानसभेचे जे सो कॉल्ड अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत, आज राजीनामाच नाही तर त्यांना बडतर्फ केले नाही तर सर्वसामान्य माणसापासून जरांगे पाटलांपर्यंत सर्वांना माझे आवाहन आहे की, आपण सर्वांनी त्या विधानभवनावर पोहचून ते अधिवेशन बंद पाडायचं. बास झालं आता, ही लोकशाही नाही. लोकशाही ही लोकांसाठी असते, पण ही राजेशाही आहे आणि हीच राजेशाही आपण बंद पाडायची.