Disha Salian Case News aaditya Thackeray press conference in mumbai
मुंबई : राज्यामध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला नवीन दिशा मिळाली आहे. हिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. यामध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचे यांच्यावर आरोप केले जात होते. यामुळे सत्ताधारी नेत्यांनी आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरुन आदित्य ठाकरे यांनी थेट राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. तसेच माध्यमांशी संवाद साधून आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिशा सालियान प्रकरणावरुन टीका करणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही विरोधकांमी राज्यपालांची भेट घेतली आहे. आम्ही राज्याचे अनेक मुद्दे हे सभागृहामध्ये मांडतो. मात्र सत्ताधारी लोकंच सभागृहाचे कामकाज बंद पाडत आहेत. कारण त्यांच्याकडे कोणताही अजेंठा राहिलेला नाही. सभागृह हे नियमांनुसार चालत नाही. हा महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान सत्ताधारी नेत्यांकडून केला जातो आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलून समज द्यावी अशी मागणी केली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ते म्हणाले की, शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार यामध्ये तर महाराष्ट्राची परिस्थिती वाईटच आहे. महाझुठीचे जे काही निवडणुकीतील मुद्दे होते ज्यावरुन त्यांनी निवडणूक जिंकण्याचा दावा केला होता. जे दहा मुद्दे होते त्यातील एक सुद्धा मुद्दा अर्थसंकल्पामध्ये आलेला नाही. त्यांचे हिंदूत्व आम्ही उघडे पाडले आहे. हे सगळं केल्यानंतर आता माझ्यावरुन विधीमंडळाचे कामकाज सत्ताधाऱ्यांनी बंद पाडलं आहे. सत्तधाऱ्यांना महाराष्ट्रबद्दल बोलण्यासाठी निवडून दिलेलं आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा एकदा याचिका दाखल केल्यानंतर ते म्हणाले की, पाच वर्षांपासून बदनामी सुरु आहे. मात्र कोर्टामध्ये जे होईल ते होईल. याचं उत्तर आम्ही कोर्टामध्ये देणार आहे. मी अशा गोष्टींच्या राजकारणामध्ये पडत नाही. मी कामाचं बोलत असतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकीकडे महायुतीचे नेते हे आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंची साथ दिली आहे. शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड म्हणाले की, “दिशा सालियानच्या प्रकरणात सीआयडी तपास करण्यात आला. मात्र यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांचा समावेश नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करतोय असे नाही मी जे सत्य आहे ते सांगतो आहे. हे सत्य तपासामध्ये समोर आलं आहे. कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे द्यायला हवे होते. पण कोणतेही पुरावे नसल्यामुळे आदित्य ठाकरेंना क्लिन चीट मिळाली आहे त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आता मागचे तीन वर्षे आमचे सरकार आहे. पण कोणताही पुरावा मिळालेला नाही,” असे स्पष्ट मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.