dispute between bjp mp narayan rane vs mns prakash mahajan
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. राणे आणि महाजन यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरु असून आता राणे यांनी महाजनांना थेट चॅलेंज दिले होते. नारायण राणेंच्या या खुल्या आव्हानाला प्रकाश महाजन यांनी स्वीकारले आहे.
भाजप खासदार नारायण राणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली होती. यानंतर प्रकाश महाजन यांना अनेक धमकीचे फोन आले होते. आता प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणे यांना आव्हान देणारी भाषा केली आहे. मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला तयार आहे. तसेच नितेश राणेंची वैचारिक उंची उभं राहिल्यावर लवंगेएवढी आणि बसल्यावर विलायचीएवढी असल्याचे प्रकाश महाजन म्हणाले आहेत. यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रकाश महाजन यांनी क्रांती चौकामध्ये जाऊन आंदोलन केले. यावेळी त्यांनी राणे कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मला लेचपेचा समजू नका. माझ्या नेत्यावर टीका करणार, मी काय तुमच्या मुलावर फुले उधळू का उध्दव ठाकरे यांना उध्दव म्हणतो, हा तुझ्या वयाचे आहेत का ते?. तुम्हाला भिणारे दुसरे असतील, मी कुठे येऊ सांगा. दिल्ली, मुंबई किंवा कणकवलीतल्या घरी येतो. दुर्देव आहे ज्या गोपीनाथ मुंडेंनी राज्यातील गुन्हेगारी विरोधात आवाज उठवला, त्या भारतीय जनता पार्टीत असे गुन्हेगार येऊन बसले आहेत” अशा शब्दांत प्रकाश महाजन य़ांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय होती नारायण राणेंची पोस्ट?
“एका पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे. श्रीयुत राज आणि माझ्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? कुठल्या एखादया पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करु नये एवढी तुमची कुवत नाही. श्रीयुत नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता, बुध्दीमता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे. श्रीयुत निलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात? आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेशना निष्ठा शिकविण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलटया करायला लावेन.” अशी पोस्ट नारायण राणे यांनी केली आहे.