'मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष'; राजीनाम्याच्या चर्चांवर जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण(फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यामुळे राष्ट्रवादी समर्थकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे. युतीची चर्चा सुरु असताना दोन्ही राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. यामध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. 26 व्या वर्धापन दिनी शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मात्र शरद पवार यांच्यापूर्वी भाषण करणाऱ्या जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांनी भाषण करताना थेट मंचावरुन राजीनाम्याची गोष्ट केली आहे. वर्धापन दिनी जयंत पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमोर मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मागणी केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वर्धापन दिनी भाषण करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदावरुन मुक्त करावे अशी मागणी केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी मला सात वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. आता मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा. प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी देणे देखील आवश्यक आहे. यानिमित्ताने सर्वांच्या समोर मी शरद पवारांना विनंती करेल की मला प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनाम्याची गोष्ट करताच उपस्थितांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे वाक्य पूर्ण करण्यापूर्वी सभागृहातील समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी नाही…तुम्हीच ही जबाबदारी पुढे नेली पाहिजे, अशी मागणी केली. यामुळे समर्थकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सांभाळावे अशी इच्छा असल्याचे स्पष्ट दिसून आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटातील युवा नेते व आमदार रोहित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये सारे काही आलबेल नसल्याचे बोलले जात होते. रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी देणे गरजेचे असल्याची भूमिका पक्षामध्ये मांडली असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यानंतर आता जयंत पाटील यांनी वर्धापन दिनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.