Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरण: नगरसेवक रमेश म्हात्रेंसह 3 आरोपींना जामीन; सुटकेनंतर थेट गोव्याला रवाना

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेंसह तीन आरोपींची जामिनावर सुटका झाली. न्यायालयाच्या अटींनुसार रमेश म्हात्रे चार्जशीट दाखल होईपर्यंत गोव्यात राहणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 09:58 PM
ramesh mhatre

ramesh mhatre

Follow Us
Follow Us:
  • रमेश म्हात्रेंसह तीन आरोपींना जामीन; आधारवाडी कारागृहातून सुटका
  • चार्जशीट दाखल होईपर्यंत महाराष्ट्रात प्रवेशास बंदी
  • गोव्यात राहून आठवड्यातून तीन वेळा अंजुना पोलिस ठाण्यात हजेरी
 

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह तीन पुरुष आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. जामिनाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर रमेश म्हात्रे यांची आधारवाडी कारागृहातून सुटका करण्यात आली.

मात्र, न्यायालयाने जामीन देताना काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. त्यानुसार चार्जशीट दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते थेट गोव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

चार्जशीट होईपर्यंत गोव्यातच राहावे लागणार

रमेश म्हात्रे यांना गोव्यात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गोव्यातील अंजुना पोलिस ठाण्यात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावावी लागणार आहे. तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेशही जामिनाच्या अटींचा भाग आहेत.

‘जात प्रमाणपत्र देताना अधिकारी खोडसाळपणा करतात’; मनोज जरांगेनंतर आता नरेंद्र पाटलांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

दरम्यान, रमेश म्हात्रे यांच्यासह तीन पुरुष आरोपींना जामीन मिळाला असला तरी या प्रकरणातील महिला आरोपीची अद्याप आधारवाडी कारागृहातून सुटका झालेली नाही.

पोलिसांना तपास जलद पूर्ण करण्याचे निर्देश

या प्रकरणातील तपास जलदगतीने पूर्ण करून संबंधित पुरावे न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. यामध्ये घटनास्थळावरील CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर महत्त्वाच्या पुराव्यांचा समावेश आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

दरम्यान, यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान रमेश म्हात्रे यांनी उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी विनंती केली होती. महाराष्ट्राबाहेर ठेवले तरी चालेल, मात्र जामीन द्यावा, अशी भूमिका त्यांनी न्यायालयासमोर मांडल्याचे सांगण्यात आले होते. अखेर न्यायालयाने काही कठोर अटी आणि शर्तींसह त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे आधारवाडी कारागृहातून सुटका होताच रमेश म्हात्रे महाराष्ट्राबाहेर रवाना झाले आहेत. आता तपास आणि चार्जशीटच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Dombivli doctor assault case ramesh mhatre bail goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • dombivli crime case
  • Dombivli News

संबंधित बातम्या

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु
1

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.