Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या मागे फायनान्स कंपन्यांनी लागू नये; एकनाथ शिंदेंचा थेट जेलमध्ये टाकण्याचा इशारा

Eknath Shinde : महाड दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवरून फायनान्स कंपन्यांना कडक इशारा दिला. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Shaina NC, Eknath Shinde, Shiv Sena, Sunetra Pawar, NCP Ajit Pawar, Maharashtra Politics, MLC Election,
शेतकऱ्यांच्या मागे फायनान्स कंपन्यांनी तगादा लावू नये, अन्यथा जेलमध्ये टाकू! एकनाथ शिंदेंचा इशारा(Stock Photo - Social Media)
Published on: 
Updated on: 
  • शेतकऱ्यांना त्रास दिल्यास फायनान्स कंपन्यांना जेलमध्ये टाकू!

  • कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना

  • मराठवाड्यातील जनावरांसाठी 50 ट्रक चारा पाठवणार

Eknath Shinde warns Finance Companies : दुष्काळ आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारसोबत शिवसेनाही मैदानात उतरली आहे. शेतकऱ्यांनी कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये, त्यांच्यामागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी फायनान्स कंपन्यांना थेट इशाराही दिला. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असं शिंदे म्हणाले.

महाडमधील कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अडचणींवर बोलताना शिंदे यांनी त्यांना दिलासा देण्याची भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने उचलल्याची माहितीही त्यांनी दिली.

Shaina NC, Eknath Shinde, Shiv Sena, Sunetra Pawar, NCP Ajit Pawar, Maharashtra Politics, MLC Election,
Thane Congress Rally : संविधान बचावासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यातून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल, हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांना थेट इशारा

दरडग्रस्तांचं पुनर्वसन लवकरच मार्गी लागणार

महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबतही शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. तळीये आणि पारमाची येथील बाधित कुटुंबांना लवकरच घरे मिळतील, असं आश्वासन त्यांनी दिलं. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

मराठवाड्यासाठी रायगडमधून 50 ट्रक चारा!

दुष्काळाचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील जनावरांसाठी रायगड जिल्ह्याने मदतीचा हात पुढे केला आहे. महाड आणि पोलादपूर परिसरातून चारा संकलित करून लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चारा वाहून नेणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या उपक्रमातून जवळपास 50 ट्रक चारा पाठवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यावेळी मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.

चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 100 कोटी!

महाडच्या विकासकामांबाबत बोलताना शिंदे यांनी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच महाडमधील दरडग्रस्तांना घरे बांधून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.

'जे काम कोणी करत नाही, तेच एकनाथ शिंदे करतो,' असं म्हणत त्यांनी आपल्या कामाची भूमिका मांडली. शेतकरी मदत, दरडग्रस्तांचं पुनर्वसन आणि महाडचा विकास या मुद्द्यांवर शिंदे यांनी यावेळी भाष्य केलं.

Shaina NC, Eknath Shinde, Shiv Sena, Sunetra Pawar, NCP Ajit Pawar, Maharashtra Politics, MLC Election,
पुण्याचं पालकत्व फडणवीसांकडे दिलं तर वाटोळं होईल! रोहित पवारांनी सुनावलं, वाढती गुन्हेगारी गृहमंत्र्यांचं अपयश?