Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीमध्ये वार पलटवार; ‘ती’ टीका लागली कॉंग्रेसच्या जिव्हारी, वडेट्टीवारांनी दिले प्रत्युत्तर

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांना टोला लगावला आहे. तर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपावर संशय व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 10, 2025 | 01:07 PM
Vijay Wadettiwar target mahayuti for mMalhar Mutton vs Halal Mutton

Vijay Wadettiwar target mahayuti for mMalhar Mutton vs Halal Mutton

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीचा निकाल लागून दीड महिना झाला असून नेत्यांच्या नाराजीचा पूर आला आहे.  महायुतीमध्ये खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराजी आहे. तर महाविकास आघाडीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यामध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांना टोला लगावला आहे. तर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन संशय व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, “विधानसभा निवडणूकीत जागावाटपाची चर्चा 20 दिवस चालली. यात काही षडयंत्र होतं का. नाना पटोले, संजय राऊत हे चर्चा करत होते. आम्हीही होतो. पण जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते. जागावाटपात इतका वेळ वाया घालवला, काही प्लानिंग होतं का?  बैठक 11 वाजता असायची आणि यायचे दोन वाजता. अनेक नेते उशीरा यायचे. 20 दिवस हा घोळ चाचला. त्यामुळे फटका बसला. 20 दिवस जागावाटपात वेळ घालवण्यात काही षडयंत्र होतं का? यात वाव आहे,” असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन संशय व्यक्त केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये बिघाडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांवर टीका केली आहे.

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना मित्रपक्षांवर जोरदार टीका केली. यावर देखील विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात 9 कोटी मतदार आहे तर 9 कोटी 16 लाख आले कुठून ?  “झोल झालं” करून हे सरकार आले आहे. EVM च्या भरवश्यावर सरकार आले, पाश्वी बहुमत संदर्भात चर्चा करत आहे. कोल्हेंना एवढंच सांगतो त्यांनी स्वता:च्या पक्षाकडे जास्त लक्ष देऊन आम्हाला सल्ला कमी द्यावा,” असा टोला कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते अमोल कोल्हे?

बैठकीमध्ये खासदार अमोल कोल्हे म्हणाले की,”विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे,” असे वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केले.

Web Title: Fight in mahavikas aghadi congress vijay wadettiwar hits out at amol kolhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • amol kolhe
  • Mahavikas Aghadi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.