Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narhari Zirwal Viral Video: झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांचा विधानसभेत लेटरबॉम्ब

जे सरकारमध्ये नको आहेत, त्यांना टार्गेट केलं जात आहे. प्रत्येकाला स्वत:साठी जागा रिकामी करून घ्यायची आहे, त्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 26, 2026 | 03:08 PM
Narhari Zirwal, Devendra Fadnavis, NCP Internal Conflict

Narhari Zirwal, Devendra Fadnavis, NCP Internal Conflict

Follow Us
Close
Follow Us:
  • नरहरी झिरवाळ यांना अडकवण्यासाठी सत्ताधारी पक्षातीलच एका माजी मंत्र्याने सापळा रचला असल्याचा गंभीर आरोप
  • माजी मंत्र्याला मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी झिरवाळ यांची विकेट पडणे जरुरीचे
  • सध्या समोर आलेले व्हिडिओ केवळ मोबाईल आणि लॅपटॉपमधील आहेत. मात्र, खरा ‘पेनड्राईव्ह’ अजून समोर यायचा आहे
Vijay Wadettiwar on  Narhari Zirwal Viral Video : विधानसभा उपाध्यक्ष आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची एक कथित व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. या सगळ्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे झिरवाळ यांचे व्हिडीओ कोणी व्हायरल केले त्यांना अडकवण्यासाठी कुणी प्लॅनिंग केलं होतं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, झिरवाळ यांना अडकवण्यसाठी एका माजी मंत्र्यानेच ट्रॅप लावल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, ‘ सरकारमधल्या एका माजी मंत्र्यालाच झिरवाळ यांची जागा रिकामी करायची आहे, त्यासाठी एक मोठे नाव समोर आले आहे. झिरवाळ यांची जागा झाली तरच सरकारमध्ये त्यांना पुन्हा जागा मिळू शकते, त्यासाठी हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.’

Minor Girls Missing: अल्पवयीन मुलींच्या अपहरणात चिंताजनक वाढ; विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक

जे सरकारमध्ये नको आहेत, त्यांना टार्गेट केलं जात आहे. प्रत्येकाला स्वत:साठी जागा रिकामी करून घ्यायची आहे, त्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. यात एका मंत्र्याची विकेट पडली की दुसरा टपूनच बसलेला असतो. त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढायली तिसराही लाईनमध्ये बसलेला आहे. याअंतर्गत हे सगळं घडत आहे.

आणखी तीन मंत्र्यांची विकेट पडणार

मी कालच बोललो होतो की, पेनड्राईव्ह समोर आल्यानंतर किमान तीन मंत्र्यांचे विकेट पडू शकतात. व्हिडीओ पुढे आले तर तेही पदावर राहू शकणार नाहीत. रुपाली चाकणकर यांनी धुतले, तर त्यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्यांच्यापेक्षाही अधिक विचित्र व्हिडीओ त्या पेनड्राईव्हमध्ये आहेत. समोर आलेले व्हिडीओ हे फक्त मोबाइलमधले आहेत. लॅपटॉपमधले आहेत. पण खरा पेनड्राईव्ह अजून समोर आलेला नाही. सोयीच जेवढं आहे, तेवढंच काढून दाखवलं जात आहे.”असा खुलासा विजय वडेट्टीवार यांनी खरात प्रकरणात केला आहे.

 

Narhari Zirwal Viral Video: नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ

विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी जोर धरण्याची शक्यता

नरहरी झिरवाळ यांच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले होते. त्यावेळीच विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आता ही नवीन चित्रफीत समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, झिरवाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अद्याप नरहरी झिरवाळ किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

 

 

 

Web Title: Former minister trapped narhari zirwal to vacate his seat vijay wadettiwars explosive claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.