Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हायरल फोटोप्रकरणी गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; “फोटो मॉर्फ केलेला, मुंबईत तक्रार दाखल करणार”

गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी तो मॉर्फ केलेला असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी मुंबईत तक्रार दाखल करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 19, 2026 | 06:51 PM
व्हायरल फोटोप्रकरणी गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; "फोटो मॉर्फ केलेला, मुंबईत तक्रार दाखल करणार"

व्हायरल फोटोप्रकरणी गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; "फोटो मॉर्फ केलेला, मुंबईत तक्रार दाखल करणार"

Follow Us
Follow Us:
  • मंत्री गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  • संबंधित फोटो मॉर्फ केलेला असल्याचा महाजनांचा दावा
  • व्हायरल फोटोवरून काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून अप्रत्यक्ष टीका
 

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या फोटोवरून विरोधकांकडून टीका होत असताना आता गिरीश महाजन यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बुलढाण्यात माध्यमांशी बोलताना महाजन यांनी संबंधित फोटो मॉर्फ केलेला असल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत आपण मुंबईत अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“फोटो कसा तयार केला माहिती नाही”

गिरीश महाजन म्हणाले, “हा फोटो पूर्णपणे मॉर्फ केलेला आहे. तो नेमका कसा तयार करण्यात आला याची मला माहिती नाही. मात्र या प्रकरणी मी उद्या मुंबईत तक्रार दाखल करणार आहे. संबंधित बाबींची चौकशी व्हावी अशी माझी मागणी असेल.” महाजन यांच्या या प्रतिक्रियेनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ramadas Kadam: ‘६ नाही, ७ व्या खासदारानेही सही केलीये…’, रामदास कदमांचा सर्वात मोठा बॉम्ब, ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप!

संजय राऊतांच्या टीकेलाही दिले उत्तर

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या कथित फुटीच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी, “माझ्याकडे फक्त एक दिवसासाठी ईडी आणि सीबीआय द्या, मी गिरीश महाजन यांना फोडून दाखवतो,” असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, “त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे. ते नेहमीच बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांकडे मी फारसे लक्ष देत नाही.”

काँग्रेसची अप्रत्यक्ष टीका

व्हायरल फोटोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरूनही अप्रत्यक्ष टीका करण्यात आली. गिरीश महाजन यांचे नाव न घेता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये “देवेंद्र फडणवीसांचा नाशिकचा संकटमोचकच आज संकटात अडकल्याचं कळतंय. किरीट सोमय्या नंतर आता या संकटमोचकाने संघाचे संस्कार दाखवलेत म्हणे,” अशी कोपरखळी मारण्यात आली.

41, 60, 68,…………?? देवेंद्र फडणवीसांचा नाशिकचा संकटमोचकच आज संकटात अडकल्याचं कळतंय. किरीट सोमय्या नंतर आता या संकटमोचकाने संघाचे संस्कार दाखवलेत म्हणे. नेमके काय प्रकरण आहे?
तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा….
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 19, 2026

राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता

आधीच राज्यात पक्षफुटी, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय संघर्षामुळे वातावरण तापलेले असताना या व्हायरल फोटो प्रकरणाने नवा वाद निर्माण केला आहे. महाजन यांनी फोटो मॉर्फ असल्याचा दावा करत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने आता या प्रकरणाचा तपास आणि पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवा आणि मग..,’ शरद पवार गट फुटीच्या चर्चेवरून अनिल देशमुखांचा ‘त्या’ आमदारावर निशाणा

Web Title: Girish mahajan reaction on viral photo morphed image complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • girish mahajan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.