Gunaratna Sadavarte reaction on Marriages between citizens of India and Pakistan
यवतमाळ : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यामुळे संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलण्यात आली आहे. भारतामध्ये असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. तसेच पाकिस्तानी सिलेब्रिटीचे अकाऊंट भारतामध्ये वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र अनेक पाकिस्तानी महिला या लग्न करुन भारतामध्ये आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, याबाबत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मत मांडले आहे.
यवतमाळमध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये झालेल्या विवाहाच्या मुद्द्यावर मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की,”हजारो पाकिस्तानी महिला लग्न करून भारतात वसल्या आहेत. भारतात आतंकी कारवाया सफल करण्यासाठी हा मॅरेज जिहाद तर नाही ना असा खळबळजनक सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. तसेच लग्न ही संकल्पना नसून बॉस बॉर्डर टेररिझम असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहाद बद्दल बोललं पाहिजे. पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही, असे देखील सदावर्ते म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मुंब्रा आणि कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहे का? हे सांगावं. आपण लोकप्रतिनिधी आहात. मात्रं पत्रकारांना भीती घालण्याचं काम करताय. शेतकऱ्यांना कष्टाचा मोबदला द्यावा, सोयाबीनला साडेसात हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही शासनास करतो. पुसद तालुक्याला पुष्पावंती नगरी म्हणून जिल्हा घोषित करावा, अशी आमची भूमिका आहे. या तालुक्याने महाराष्ट्राला नाईकांच्या रुपात दोन मुख्यमंत्री दिले. राज्यमंत्री इंद्रनील नायकांनी स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घ्यावा. विदर्भातीलच महसूल मंत्री व मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबींचा विचार करायला हवा व पुसद जिल्हा करावा. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हा आमचा दौरा सुरू आहे,” मत वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी पुसद येथील दौऱ्या दरम्यान केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाकिस्तानी तरूणीशी लग्न केल्यामुळे CRPF जवानाच्या अडचणीत वाढ
केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) कॉन्स्टेबल मुनीर अहमद यांना सेवा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता, पण याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली नव्हती. शिवाय, हा विवाह कोणत्याही अधिकृत मान्यतेशिवाय करण्यात आला होता. त्यामुळे नियमभंगाच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना सेवेतून हटवण्यात आले आहे. मुनीर अहमद यांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वू पाकिस्तानच्या मीनल खान या नागरिकासोबत विवाह केला होता. विवाहानंतर मीनल खान व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि पुढे दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला. मात्र, तिच्या व्हिसाची मुदत 22 मार्च 2025 रोजी संपूनही ती भारतातच थांबली होती.