Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी पाहुणा नाही तर इथला मुखिया, मायभूमीत आल्याचे मला समाधान’; केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भावूक उद्गार

सुरुवातीला अवघे २० किल्ले असताना पराक्रमाची शर्थ करीत आणि गनिमी कावा यांचा अवलंब करून अत्यंत कमी काळात ३६५ किल्ल्यांचे स्वराज्य विस्तारित करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या छत्रपती शिवरायांकडे होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 28, 2025 | 11:14 AM
'मी पाहुणा नाही तर इथला मुखिया, मायभूमीत आल्याचे मला समाधान'; केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे विधान

'मी पाहुणा नाही तर इथला मुखिया, मायभूमीत आल्याचे मला समाधान'; केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे विधान

Follow Us
Close
Follow Us:

कोरेगाव : इतिहासकाळात आम्ही महाराष्ट्राबाहेर गेलो असलो तरी, या मातीशी आमची नाळ कायम जुळलेली आहे. मी पाहुणा नाही तर इथला मुखिया आहे. मायभूमीत आल्याचे समाधान वाटते, असे भावूक उद्गगार केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कण्हेरखेड येथे काढले.

आपल्या मूळगावी सोमवारी केंद्रीय दळणवळणमंत्री आणि ईशान्य क्षेत्राचे विकासमंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी सदिच्छा भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी मंत्री शिंदे यांच्या पत्नी प्रियदर्शनीराजे शिंदे, युवराज महाआर्यमानराजे, सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

एक-एक मावळा जमवून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सुरुवातीला अवघे २० किल्ले असताना पराक्रमाची शर्थ करीत आणि गनिमी कावा यांचा अवलंब करून अत्यंत कमी काळात ३६५ किल्ल्यांचे स्वराज्य विस्तारित करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या छत्रपती शिवरायांकडे होते. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून अनेक सरदारांनी अटकेपार घोडदौड केली, असे सांगून ज्योतिरादित्य शिंदे यांनी पानिपतच्या रणसंग्रामाला उजाळा दिला. यावेळी “हर हर महादेव…” अशी जोरदार घोषणा देत उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.

इथल्या वाड्याचा दगड आणि दगड आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत असल्याचे सांगून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य पुढे नेण्याचे काम अनेक सरदारांनी केले. त्यात शिंदे घराण्याचे योगदान बहुमोल असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

“बचेंगे तो और भी लढेंगे” या दत्ताजी शिंदे यांच्या रणसंग्रामावरील प्रसंगाची आठवण करून देत असतानाच दहा वर्षानंतर पानिपतच्या रणसंग्रामास तोडीस तोड उत्तर देऊन मोघलांना धडा शिकवण्याची धमक शिंदे परिवारातील दिग्गजांनी दाखवली असल्याचेही आवर्जून सांगितले. तसेच अत्यंत कमी कालावधीत उत्तम कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थ व संयोजकांचेही कौतुक केले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या भाषणात ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव शिंदे, आजी विजयाराजे शिंदे यांच्याशी आपले वडील अभयसिंहराजे भोसले व आजी सुमित्राराजे भोसले यांचे वैचारिक आणि भावनिक नाते होते, असे सांगून कण्हेरखेडच्या सुपुत्रांनी राज्याबाहेर गाजवलेला पराक्रम वंदनीय असल्याचे सांगितले.

दरम्यान, कोणत्याही कार्यक्रमासाठी इतक्या संख्येने गावकरी जमत नाहीत. तुमचे या गावाशी असलेले ऋणानुबंध अखंड असल्यानेच मोठ्या जिव्हाळ्यातून हा जनसागर येथे जमला आहे. पराक्रमी सरदार घराण्यांची शिवछत्रपतींवर श्रद्धा तसेच स्वराज्यावर अपार निष्ठा असल्यामुळे शिवस्वराज्य अटकेपार पोहोचले, असेही त्यांनी सांगितले.

मायभूमीची माती लावली कपाळी 

ज्योतिरादित्य सिंधिया, प्रियदर्शनी शिंदे व युवराज महाआर्यमानराजे यांनी कण्हेरखेड गावांमध्ये प्रवेश करताच गावच्या कमानीसमोर आपल्या मायभूमीच्या चरणी माथा टेकवला व कण्हेरखेडची माती आपल्या कपाळी लावली. आपल्या गावाविषयीची ही कृतज्ञता उपस्थितांना विशेष भावली.

Web Title: I am happy to have returned to my homeland says union minister jyotiraditya scindia nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 11:13 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.