Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshay Shinde Encounter : “अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा

बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर पोलिसांकडून करण्यात आला. मात्र आता अक्षय शिंदे याने बलात्कार केला नसल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2025 | 04:55 PM
Jitendra Awhad claims Akshay Shinde did not rape accused in Badlapur case

Jitendra Awhad claims Akshay Shinde did not rape accused in Badlapur case

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: बदलापूरमध्ये शालेय मुलींवर अत्याचार करण्यात आले. दोन शालेय विद्यार्थ्यींनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे बदलापूरमध्ये वातावरण तापले होते. विरोधकांनी देखील हे प्रकरण उचलून धरल्यानंतर सर्वांनी कारवाईची मागणी केली होती. मात्र पोलीसांच्या ताब्यामध्ये असेलल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. मात्र पोलिसांसोबत अक्षय शिंदे याच्या झ़टापटीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यावर आता शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदेने बलात्कार केला नसल्याचा मोठा दावा केला आहे.

शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत. आव्हाड म्हणाले की, “पोलिसांना बदनाम केलं जातंय. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते अंतर हास्यास्पद आहे. त्याच्या हाताला बेड्या होत्य. मग तो कोणता रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातून काढणार? आता तर हेही सिद्ध झालंय की त्या रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेचे ठसेच नाहीत. हे प्रकरण बलात्काराचं असल्याने लोक बोलायला घाबरतात. पण अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही.” असा मोठा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “बलात्कार केलेल्यांना सोडवण्याकरता अक्षय शिंदेची हत्या झाली. बलात्कार केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई म्हणतोय, अक्षय शिंदेची हत्या झाल्यानंतर ते लगेच हजर झाले. यातील सर्वात मोठी गोष्ट असते माणसाची मेमरी शॉर्ट आहे. या एकाच गेमवर सरकार खेळत असतं, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना एका चहावाल्याने सर्व काही सांगितले असल्याचा दावा केला आहे. आव्हाड म्हणाले की, “अक्षय शिंदेला जिथे मारलं तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारलं तिथे बाजूला एक चहावाला उभा होता. त्या चहावाल्याने मला फोन करून सगळं व्यवस्थित सांगितलं. इथे काहीतरी झालंय, फायरिंग झाल्याचा आवाज आल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर अक्षय शिंदेचं दुपारपर्यंत प्रकरण समोर आलं. आता प्रश्न हा आहे की अक्षय शिंदेवर ज्याने गोळ्या झाडल्या त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांची चौकशी करा असं न्यायालयाने म्हटलंय. पण पहिल्याच दिवशी कोर्टाने विचारलं होतं की हे कसं काय होऊ शकतं? हायकोर्टाने स्वतःहून याचिका उचलली होती. प्रश्न हा आहे की अजून पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

“संजय शिंदेंसारखा ज्येष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस वॅनमध्ये बसून जातो. आम्ही लहानपणापासून पोलीस पाहतोय किंवा गँगवॉर पाहतोय. मुंबईचे पोलीस काय करू शकतात, हे दाऊदला सर्वात जास्त माहित होतं, म्हणूनच तो दुबईत बसला होता. त्याला माहितेय मुंबईतले पोलीस हेच खरे भाई आहेत, ज्या दिवशी हे ठरवतील त्या दिवसापासून आपलं जीणं मुश्कील होईल. त्यापेक्षा आपण गेलेलं बरं. म्हणून दाऊद दुबईला निघून गेला, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांच्या शौर्याचे कौतुक केले. मात्र बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये अत्याचार हे अक्षय शिंदे केले नसल्याचे मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Web Title: Jitendra awhad claims akshay shinde did not rape accused in badlapur case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Akshay Shinde Encounter
  • Badlapur case

संबंधित बातम्या

Badlapur Crime : बदलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात कोर्टाचा दणका; राऊतसह ४ जणांना जन्मठेप
1

Badlapur Crime : बदलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात कोर्टाचा दणका; राऊतसह ४ जणांना जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.