फोटो सौजन्य: सोशल मीडिया
विधानसभा निवडणूकीत महायुतीन बहुमताने राज्यात निवडून आली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या युतीने राज्यात आणलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता खासदार श्रीकांत शिंदे यांचा राजकारणातील सिंघम असा उल्लेख असलेले बॅनर सध्या कल्याण बदलापूर परिसरात झळकत आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे यांचा येत्या ४ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दहा दिवस आधीच कल्याण ते बदलापूरपर्यंत खासदार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. भल्या मोठ्या बॅनरवर खासदारांच्या फोटोसह राजकारणातील सिंघम असे त्यावर लिहीण्यात आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामगिरी आणि पक्षाला मिळालेले यशामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
महानगरपालिका निवडणूक लवकरट होणार आहे. या निवडणूकीत कल्याण डोंबिवली सत्ता कोणाची येईल,यासाठी सर्व पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीत राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेच्या फूटीनंतर पहिली महानगरपालिका निवडणूक होणार आहे. कल्याण डोंबिवली खासदार शिंदे यांचे राजकीय वर्चस्व आहे. सध्या शिवसेनेसमोर एकच पक्ष दिसतो. तो आहे त्याचा मित्र पत्र भाजप. इतर पक्ष नावापूरते असल्याचे बोलले जात आहे.
Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती खालावली; सर्व दौरे रद्द
शिवसेनेचे खासदार शिंदे हे २०१४ साली प्रथम निवडून आले. मात्र २०१९ साली पुन्हा खासदार पदी निवडून आल्यावर त्यांचे पारडे जड होत गेले. लोकसभा मतदार संघात हजारो कोटी रुपयांचा निधी आणून पायाभूत सोयी सुविधांचे आणि जनकल्याणांचे प्रकल्प उभे करण्याचे काम सुरु आहे. काही प्रकल्प मार्गी लागले आहे. या कामांना प्रभावीत होऊन अनेकांनी त्यांचे नेतृत्व स्विकारत शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार शिंदे हे त्यांच्या ताकदीवर शिवसेनेची सत्ता आणू शकतात. हे बोलल्यास वावगं ठरणार नाही. ४ फेब्रुवारी रोजी खासदार शिंदे यांचा वाढदिवस आहे.
Raj Thackeray News: राज ठाकरेंनी नाशिकचा दौरा एका दिवसातच गुंडाळला; नेमकं झालं काय?
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दहा दिवस आधीच त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव सुरु झाला आहे. कल्याण डोंबिवलीत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीणमध्ये त्यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. कल्याण ग्रामीण, अंबरनाथ आणि कल्याण पश्चिम या विधानसभा खासदार शिंदे यांनी त्यांच्या ताकदीवर आमदारांना निवडून आणले आहे. उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवलीत खासदार शिंदे यांनी भाजपला दिलखुलासपणे मदत केली. त्यामुळे भाजपचे आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. हे देखील तितकेच खरे आहे. म्हणूनच कल्याण बदलापूर परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकत आहेत.