Jitendra Awhad targets Rahul Solapurkar for controversial statement on Dr Babasaheb Ambedkar
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकर हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी लाच दिली होती, असे विधान अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये टीकेची झोड उठली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर राहुल सोलापूरकर व्हिडिओ शेअर करुन जोरदार हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले सोलापूरकर?
शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल सोलापूरकर म्हणाले की, “रामजी सपकाळ यांच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले एक भिमराव की जो आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीकडून दत्तक घेतला जातो. त्याच नावावरून पुढे भिमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हटलं आहे, तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या आर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर याने केलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, ‘राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !!’ अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ… pic.twitter.com/DHfhVgohqe
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली? याबाबत राहुल सोलापूरकर यांनी अजब दावा केला आहे. महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले, असे धक्कादायक विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. यामुळे राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात आला होता. हे प्रकरण तापल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी देखील मागितली होती. आता मात्र जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधित विधान केल्यामुळे नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.