महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. ठाण्यासह संपूर्ण राज्यामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आताच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एकेकाळी रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे हे राज्याच्या राजकारणात 'जायंट किलर' ठरले आहेत.
shivsena leader and dcm eknath shinde birthday special political story
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा आज वाढदिवस साजरा करत आहेत. एकनाथ शिंदे हे आज त्यांचा 61 वा वाढदिवस साजरा केला जात आहे.
2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव नेतृत्व म्हणून पुढे आले. तेव्हापासून आजपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याभोवती राजकारण फिरते आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील जावळी हे त्यांचं जन्मगाव आहे. एकनाथ शिंदे यांच्या वडिलांचं नाव संभाजी नवलू शिंदे आहे, तर आईचं नाव गंगुबाई संभाजी शिंदे आहे
एकनाथ शिंदे यांचे वडील शेतकरी होते. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांना शिक्षण अर्थवट सोडावे लागले होते. तसेच ण्यातील वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केले
'आज ना उद्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, त्यांच्या चेहर्यामुळेच...'; 'या' पदाधिकाऱ्याचं मोठं विधान (File Photo : Eknath Shinde)
राजकारणाकडे वळल्यानंतर एकनाथ शिंदेंनी वयाच्या 18 व्या वर्षी शिवसैनिक म्हणून काम सुरू केलं. पुढे ते आनंद दिघेंच्या संपर्कात आले. आनंद दिघे यांचे विश्वासू म्हणून एकनाथ शिंदे यांना ओळखले जात होते.
एकनाथ शिंदे यांना वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच 1984 साली किसन नगर शिवसेनेच्या शाखेचे अध्यक्ष झाले. 1997 साली ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे 2001साली त्यांच्याकडे ठाणे महापालिकेचं सभागृह नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
एकनाथ शिंदे हे त्यांच्या प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन कामासाठी ओळखले जाते. त्यांना राजकारणातील कॉमन मॅन म्हणून ओळखले जातात.
Photo Credit- Social Media महायुतीच्या बैठकांना अनुपस्थिती, एकनाथ शिंदेंना नेमकं झालंय काय
शिवसेनेतील या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले. पक्ष आणि चिन्ह मिळवून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची धुरा सांभाळली आहे.