Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा… हे काय पाळणाघर आहे का?’ बाळासाहेब ठाकरेंची किरण पावसकरांकडून जाहीर मंचावर खिल्ली !

शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्यात किरण पावसकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातील विधानानंतर आता एकनाथ शिंदे कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 22, 2026 | 07:12 PM
बाळासाहेब ठाकरेंची किरण पावसकरांकडून जाहीर मंचावर खिल्ली !

बाळासाहेब ठाकरेंची किरण पावसकरांकडून जाहीर मंचावर खिल्ली !

Follow Us
Follow Us:
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गट अडचणीत
  • किरण पावसकर यांनी जाहीर मंचावर केलेल्या विधानामुळे तापले राजकीय वातावरण, सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया
  • “मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा… हे काय पाळणाघर आहे का?” – किरण पावसकर
 

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. फुटीर खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या एका वक्तव्यामुळे शिंदे गट अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नेते किरण पावसकर यांनी जाहीर मंचावर केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. याच कार्यक्रमात भाषण करताना किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त टिप्पणी केली.

पावसकरांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड

“मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा… हे काय पाळणाघर आहे का?” असे वक्तव्य पावसकर यांनी केले. त्यांच्या या विधानाचा संबंध बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणात पुढे आणण्याच्या निर्णयांशी जोडला जात असून, त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे बाळासाहेबांच्या भूमिकेची खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे.

‘ट्रिपल संजय आमच्याकडे आहेत, चौथा संजय…,’ 6 खासदारांच्या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला

या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक शिवसैनिक आणि ठाकरे समर्थकांनी नाराजी व्यक्त करत, बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षातच त्यांच्या वारशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी वक्तव्ये कशी केली जाऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे, काही जणांनी हे वक्तव्य केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरील राजकीय टीका असल्याचेही म्हटले आहे.

एकनाथ शिंदे करणार कारवाई ?

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घडल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि हिंदुत्वाच्या भूमिकेचे आम्ही खरे वारसदार असल्याचा दावा सातत्याने करणाऱ्या शिंदे गटासमोर आता या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Operation Tiger : ‘या’ दोन फुटीर खासदारांना लागणार थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी, मुंबईतील व्हायबी सेंटरमधून होणार मोठी घोषणा

किरण पावसकर यांच्या वक्तव्याबाबत शिवसेनेकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली, तरी या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पक्ष नेतृत्व या प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहते आणि पुढे काही कारवाई केली जाते का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kiran pawaskar controversial statement on balasaheb thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 07:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.