Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Assembly Election 2025: लालू प्रसाद यादवांच्या घरासमोर राडा; तिकीट कापल्याने मदन शाहांचे कुर्ता फाड आंदोलन

मदन शाह यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी संजय यादव यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत संजय यादव तिकीट विकत असल्याचा आरोप केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 19, 2025 | 02:02 PM
Bihar Assembly Election 2025

Bihar Assembly Election 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
  • बिहार विधानसभा निवडणुकीत संजय यादव तिकीट विकत असल्याचा आरोप
  • राज्यातील एकूण २४३ विधानसभा जागांसाठी निवडणुका दोन टप्प्यात

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.अनेक जागांवर तिकीटवाटपावरून तणाव दिसू लागला आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर बिहारचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. बिहारमधील मधुबन विधानसबा मतदारसंघाचे राष्ट्रीय जनता दलाचे माजी उमेदवार मदन शहा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानासमोर मोठमोठ्याने रडताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मदन शाहांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर तिकीटासाठी पैसे मागितल्याचा आरोपही केला आहे.

पुण्यात गुंडाराज ! मार्केटयार्ड भागात पोलिसावरच हल्ला, लोखंडी कड्याने डोळ्यावर…

संजय यादव यांच्यावर गंभीर आरोप

मदन शाह यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी संजय यादव यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत संजय यादव तिकीट विकत असल्याचा आरोप केला आहे. संजय यादव यांनी त्यांच्याकडे २७ कोटी रुपये मागितल्याचाही दावा केला आहे. तसेच, मदन शाहांनी पैसे देण्यास नकार दिला असता संजय यादव यांनी तिकीट रद्द केले आणि डॉ. संतोष कुशवाहा यांना देण्यात आले. संतोष कुशवाहा हे सीमांचल प्रदेशातील जेडीयुचे एक प्रमुख नेते होते. ते अलीकडेच राष्ट्रीय जनता दलात समील झाले आहेत. पण आपण १९९० पासून राष्ट्रीय जनता दलात आहोत. असंही त्यांनी नमुद केल.

पूर्व चंपारण्यमधील मधुबन विधानसभा मतदारसंघाचे माजी उमेदवार मदन शाह माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या १० सर्कुलर रोड येथील निवासस्थानी पोहोचले होते. आरजेडीचे तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी त्यांचा कुर्ता फाडला आणि रस्त्यावर पडून निषेध नोंदवला. इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने आदीच आपल्या अनेक जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात अशा अनेक जागांचाही समावेश आहे, जिथे त्यांनी स्वत:च्या मित्रपक्षांच्या उमेदवारांविरूद्धही उमेदवार उभे केले आहेत.

कसोटी निवृत्तीनंतर विराट कोहली लंडनला का गेला? स्वतः खेळाडूने दिले उत्तर

राबडी देवींच्या निवासस्थानासमोर रडत  रडत  मदन शाह म्हणाले, “मला २७ कोटी रुपये आणायला सांगण्यात आले होते आणि मी उद्ध्वस्त झालो. माझे दोन मुलगे आणि मुली आहेत. मी कोणाशीही लग्न केलेले नाही. तिकीट चोरीला गेले आणि विकले गेले.” मदन शाह यांनी असेही सांगितले की त्यांनी २०२० च्या निवडणुका लढवल्या आणि २००० मतांनी पराभव पत्करला. संजय यादव हरियाणातून येतात आणि तिकिटे विकतात. मदन यादव यांनी असेही सांगितले की ते १९९० पासून राजदशी जोडलेले आहेत.

दोन टप्प्यात मतदान

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) बिहार विधानसभा निवडणूक २०२५ चा संपूर्ण वेळापत्रक आधीच जाहीर केला आहे. राज्यातील एकूण २४३ विधानसभा जागांसाठी निवडणुका दोन टप्प्यात होतील. मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होईल आणि निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. वेळापत्रकाची घोषणा होताच, संपूर्ण बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

Web Title: Madan shahs kurta phad protest in front of lalu prasad yadavs house after ticket cut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • bihar assembly election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.