Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Student Election: महाराष्ट्रात ३३ वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका होणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra College Student : विद्यार्थी परिषदांमध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर आरक्षित आणि वंचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योग्य प्रतिनिधित्व कसे मिळेल, याचाही समिती अभ्यास करणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 25, 2026 | 12:11 PM
Maharashtra College Student Elections, Suhas Pednekar Committee,

Maharashtra College Student Elections, Suhas Pednekar Committee,

Follow Us
Follow Us:
  • हिंसाचार आणि राजकीय हस्तक्षेपामुळे १९९३ पासून बंद पडलेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू
  • मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची तज्ज्ञ समिती नियमावली तयार करणार
  • अर्जांची छाननी, मतदान आणि तक्रार निवारण सुलभ करण्यासाठी डिजिटल किंवा ऑनलाइन प्रणालीचा वापर तपासला जाणार
Student Election : महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदांबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागील ३३ वर्षांपासून कधीच न घेण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणूका घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका पुन्हा सुरू होणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने आराखडा आणि नियमावली तयार करण्यासाठी १२ सदस्यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणुकांसाठी नियमावली

समिती विविध घटकांशी चर्चा करून विद्यार्थी निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शक, सर्वसमावेशक आणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. निवडणुकांमध्ये बाह्य राजकीय हस्तक्षेप आणि व्यापारीकरण रोखण्यासाठीच्या उपायांचाही अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय विद्यार्थी परिषदेच्या निधीचे व्यवस्थापन, अर्थसंकल्प, खर्च आणि लेखापरीक्षण यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची जबाबदारी समितीवर आहे. निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींसाठी अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच उमेदवारी अर्ज, छाननी आणि तक्रार निवारणासाठी डिजिटल किंवा ऑनलाइन प्रणालींच्या वापराचाही विचार केला जाणार आहे.

Congress Protest against ECI: ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची तयारी! काँग्रेसचा देशव्यापी मोर्चा, विरोधी पक्ष आक्रमक

महिला आणि विविध प्रवर्गांच्या प्रतिनिधित्वाचाही अभ्यास

विद्यार्थी परिषदांमध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर आरक्षित आणि वंचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योग्य प्रतिनिधित्व कसे मिळेल, याचाही समिती अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वाबाबतही शिफारसी केल्या जाणार आहेत.

१९९३ नंतर कॅम्पस निवडणुका ठप्प

१९८० आणि १९९० च्या दशकात महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या आवारात (कॅम्पस) राजकीय हस्तक्षेप, हिंसाचार आणि गुन्हेगारीचे सावट प्रचंड वाढले होते. १९८९ ते १९९० या काळात विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा थेट हस्तक्षेप वाढला. वर्चस्ववादातून महाविद्यालयांमध्ये मारामार्‍या, धमक्या आणि शस्त्रास्त्रांचा वापर सुरू झाला. या हिंसाचाराचा कळस मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात झाला, जिथे एका विद्यार्थ्याची निघृण हत्या करण्यात आली.

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे तत्कालीन सरकारने तातडीने पावले उचलत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ (Maharashtra Universities Act, 1994) अंतर्गत १९९४-९५ शैक्षणिक वर्षापासून थेट विद्यार्थी निवडणुकांवर पूर्णपणे बंदी (Ban) घातली.

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Gen Z च्या आंदोलनानंतर विषय पुन्हा चर्चेत

कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या काळात विद्यार्थी निवडणुकांचा मुद्दा मागे पडला. मात्र, अलीकडील शिक्षणविषयक आंदोलनांमध्ये Gen Z पिढीतील तरुणांचा सहभाग वाढल्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधित्व आणि कॅम्पस निवडणुकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आता राज्य सरकारने स्थापन केलेल्या १२ सदस्यीय समितीसमोर दोन महत्त्वाची आव्हाने आहेत—विद्यार्थी निवडणुका घेण्यातील पूर्वीच्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचवणे आणि बाह्य राजकीय हस्तक्षेप तसेच व्यापारीकरणाला आळा घालत विद्यार्थ्यांना प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया निश्चित करणे. समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यार्थी निवडणुकांच्या पुढील प्रक्रियेबाबत सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे.

 

Web Title: Maharashtra college student council elections suhas pednekar committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.