Maratha leader Manoj Jarange Patil Corruption allegations against Dhananjay Munde
जालना : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर बसले आहे. 25 जानेवारीपासून जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये उपोषणावर बसले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे. जालनामधील त्यांचे अंतरवली सराटी गावामध्ये हे उपोषण सुरु होते. मनोज जरांगे पाटील यांनी सहा दिवसांच्या आमरण उपोषणानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार बजरंग सोनावणे यांनी समजावल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आहे. संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मागील दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला आहे. आमरण उपोषण, आंदोलन आणि महाराष्ट्र दौरा करुन जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मराठा समाजाला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार एकतर्फी निकालाने सत्तेमध्ये आले. याचबरोबर जरांगे पाटील यांनी सडकून टीका केलेले देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
खासदार बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करुन मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ओबीसीच्या वरचं आरक्षण नको ओबीसीतून आरक्षण पाहिजे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. मागच्या दीड वर्षापासून खूप सहन केलं. ईडब्ल्यूएसची सवलत चालू ठेवली पाहिजे. आपण आपलं आंदोलन आता स्थगित करत आहोत बंद करत नाहीत. या पुढे शक्यतो उपोषण होणार नाही. आता समोरासमोर लढण्याची तयारी ठेवायची आहे. मंत्री आणि त्यांच्या पोरांना सुद्धा सोडायचं नाही,” असा कडक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मी राज्य सरकारकडे आठ मागण्या केल्या आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका शब्दांत उत्तर मागितला होता. आरक्षण देणार हे हो म्हणा आम्ही उपोषण सोडतो. एवढचं आम्हाला बघायचं आहे. तुम्ही गद्दारी करता का नाही तेच बघायचं आहे. तुम्ही जर मराठ्यांची मागणी पूर्ण केली नाही आणि गद्दारी केली तर मी पण ओरिजनल मराठ्याचं पिल्लू आहे. माझ्यासाठी माझा अंतिम देव हा माझा समाज आहे. तुम्ही समाजाला आरक्षण द्या. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. आमच्या गरिबावर मोठे होता आणि आम्हालाच मारुन टाकता,” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.