धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात येणार का? तर मंत्री छगन भुजबळ यांनी केलं मोठं विधान; म्हणाले... (File Photo : Chhagan Bhujbal)
पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व आमदार छगन भुजबळ हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा देखील झाली. छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता छगन भुजबळ यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला.
राज्यामध्ये लाडकी बहीण योजना जोरदार चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने अर्जाची छाननी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच चुकीचे अर्ज बाद करण्यास देखील सुरुवात केली. यामुळे महिला वर्गामध्ये एकच भीती निर्माण झाली होती. तसेच बाद ठरलेले अर्जाची रक्कम राज्य सरकार पुन्हा एकदा परत घेणार असल्याचे बोलले जात होते. यावर आमदार छगन भुजबळ म्हणाले की, काही लोकांना फॉर्म भरणे, सर्व महिला ना फायदा झाला पाहिजे, जे नियम होते आता नियम बदलेले, अनेक अटी कडे दुर्लक्ष करण्यात आले. आता पैसे परत मागण्यात अर्थ नाही, ते करू नये, वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून अटी बसत असेल तर नियम करावे, एक एक म्हणतो दुसरा काहीं तरी म्हणतोय,ज्यांना गरज नाहीं त्यांनी स्वीकारावं नये, असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदावरुन नाराजीनाट्य सुरु आहे. मंत्री छगन भुजबळ हे देखील मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे नाराज होते. त्याचबरोबर नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन नाराजीचा सूर आहे. नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. मात्र शिंदे गटाचे दादा भुसे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज आहे. यामुळे पालकमंत्रिपदाच्या निर्णयावर स्थगिती आणण्यात आली आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, “मी मंत्री नाही मला पालकमंत्री माहिती नाही. आमचे ओबीसी आरक्षण व्यवस्थित राहावे,” असे मत भुजबळांनी व्यक्त केले. त्याचबरोबर बीडमध्ये अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण भुजबळ यांनी टाळलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याच्या राजकारणामध्ये सध्या शिवसेना व भाजपच्या युतीची चर्चा सुरु आहे. भाजप व ठाकरे गटामध्ये जवळीक वाढत असून नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढत आहेत. त्याचबरोबर भाजप नेते चंद्रकांत पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले होते. यावर छगन भुजबळ म्हणाले की, “सुवर्ण क्षण आहे वाट पाहायला हवी, मला काय माहिती नाही. उद्देश माहिती नाही,पक्ष प्रमुख ठरवतील सगळे,” असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
नेमकं झालं काय?
भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये भेट झाली. भाजपाचे विलेपार्ले येथील आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या लग्नसोहळ्यात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत. यामुळे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. भेटीवेळी यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मग युती कधी? अशी गुगली टाकली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी हजरजबाबीपणे मी या सुवर्णक्षणांची वाट पाहतोय, असं उत्तर देवून टाकलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.