रोहित पवार यांनी अशोक खरात यांच्या व्हिडिओमध्ये राजकीय नेते देखील असतील असा दावा केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Politics : पुणे : अंधश्रद्धेचा वापर करुन महिलांवर अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या उद्योगाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्याने शेकडो महिलांना बळी पाडून लैंगिक अत्याचार केले. तसेच याचे व्हिडिओकाढून विकले देखील आहेत. या विकृत बाबासोबत अनेक राजकीय नेत्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून आले आहे. मात्र राजकीय नेत्यांचे व्हिडिओ देखील आहेत का असा प्रश्न आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपस्थित केले आहे.
अशोक खरात प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरु आहे. यामधून अनेक धक्कादायक दावे समोर येत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर रोहित पवार यांनी भाष्य केले. रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. आमदार रोहित पवार म्हणाले की, खरात प्रकरणात केवळ सामान्य लोक किंवा अराजकीय व्यक्तींचे नव्हे तर राजकीय नेत्यांचेही व्हिडीओ आहेत. “खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडीओ आहेत का?” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? अजित पवारांचं स्वप्न पूर्ण होणार? खासदारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुढे ते म्हणाले की, “नाशिकमध्ये ३५ हनी ट्रॅप प्रकरणे समोर आली. त्यात काय कारवाई झाली? संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला का? काही अधिकाऱ्यांना गप्प केले गेले का? हे व्हिडीओ बाहेर कसे आले? हे सामान्य लोकांचे व्हिडीओ आहेत असे सांगितले जाते, पण खरंतर यात राजकीय लोकांचे व्हिडीओ आहेत. कुणाचे आहेत, कोण कोण त्यांच्यासोबत होते, हे सर्व उघडपणे समोर यायला हवे.” असा गंभीर दावा रोहित पवारांनी केला.
हे देखील वाचा : Raj Thackeray यांची भावनिक श्रद्धांजली; आशाताईंची तुलना ‘रेनेसाँस’ कलाकारांशी, म्हणाले “एक युग संपलं…”
पुढे ते म्हणाले की, “भाजप हा पक्ष नेहमीच आपल्या मित्र पक्षांना संपवण्यासाठी असे प्रकार करत असतो. नितीश कुमारचे काय झाले? साताऱ्यात काय चालले आहे? आता जर चौकशी करायची असेल तर सगळ्यांची करा. सर्व नेत्यांची चौकशी झाली व्हायला पाहिजे. त्या गेल्या पण इतर लोक का बाहेर येत नाही. एसआयटीचा चुकीचा वापर लोक करत असतील, काही लपवत असतील, काही नेते म्हणत आहेत की आमच्या लोकांचे व्हिडीओ पुढे येऊ देऊ नका.. एसआयटीचा वापर सिस्टीम क्लियर करण्यासाठी करा.” असे देखील स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.






