फोटो सौजन्य - Social Media
वयाच्या 92 व्या वर्षी भारतीय संगीतातला सुवर्ण आवाज हरपला. जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईच्या Breach Candy रुग्णालयात उपचारदरम्यान शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या नातीच्या मते, आशा भोसले यांच्या छातीमध्ये संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांना सतत थकवा जाणवत होता. उपचारासाठी हॉस्पिटलात नेले असता आज त्यांची प्राणज्योत माळवली. दरम्यान, देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आशा भोसले यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनीही आशा भोसले यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी Social Media Post करत आशा भोसले यांची तुलना सरळ ‘रेनेसाँस’ कलाकारांशी केली आहे.
कोण होते रेनेसाँस कलाकार?
रेनेसाँस (Renaissance) हा युरोपमधील १४व्या ते १७व्या शतकातील सांस्कृतिक पुनर्जागरणाचा काळ होता. या काळात कला, विज्ञान, साहित्य आणि विचारसरणीत मोठा बदल झाला. या काळात जे कलाकार नवनवीन कल्पना, वास्तववाद आणि मानवी भावना आपल्या कलेत मांडत होते, त्यांना रेनेसाँस कलाकार म्हटलं जातं. चित्रकला तसेच विज्ञान, शोध क्षेत्रात नावाजलेले नाव Leonardo da Vinci आणि शिल्पकला तसेच चित्रकलेत श्रेष्ठ Michelangelo हे रेनेसाँस कलाकार होते. यांचीच तुलना राज ठाकरेंनी लता आणि आशाताईंशी केली आहे.
काय म्हणाले मनसेप्रमुख राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले की, “ज्येष्ठ गायिका Asha Bhosle यांच्या निधनाने भारतीय चित्रपट संगीताच्या एका युगाचा शेवट झाला. Lata Mangeshkar आणि आशाताई या भारतीय संगीतविश्वातील Leonardo da Vinci आणि Michelangelo यांसारख्या दोन भिन्न पण तितक्याच प्रभावी शक्ती होत्या. लतादीदींच्या आवाजात परफेक्शन, स्थैर्य आणि आध्यात्मिकता जाणवते, तर आशाताईंच्या गाण्यात आवेग, नजाकत, खेळकरपणा आणि बंडखोरी दिसते. लहान वयातच आयुष्याची जबाबदारी स्वीकारत आशाताईंनी आपल्या आवाजाच्या जोरावर मोठं स्थान मिळवलं. आयुष्यातील संकटांवर मात करत त्यांनी दुःखाला ताकद बनवलं आणि त्यातूनच त्यांच्या गाण्यांना वेगळी खोली मिळाली. त्यांच्या गाण्यांमध्ये प्रेम, धिटाई, बंडखोरी आणि अध्यात्म अशा विविध भावनांचा संगम दिसतो. त्यामुळेच त्या अधिक मानवी वाटतात. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी भारतीय संगीताच्या सुवर्णकाळाला आकार दिला; आणि आशाताईंच्या जाण्याने त्या युगाचा शेवटचा महत्त्वाचा दुवा तुटल्याची भावना निर्माण झाली आहे.”
‘आशाताई’ -दि लास्ट एम्परर ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या… pic.twitter.com/ZdIl2H0JCP — Raj Thackeray (@RajThackeray) April 12, 2026
राज ठाकरे यांनी आशा भोसले यांना “‘आशाताई’ -दि लास्ट एम्परर” असे Title दिले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यातर्फे आदरांजली वाहिली आहे.






