Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला! ५८.१७ टक्के मतदानामुळे बदलणार राजकीय गणिते?
सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र त्यांना लवकरच राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा देखील मान मिळू शकतो अशा चर्चा रंगल्या आहेत. याचे कारण म्हणजे खासदार संजय राऊत यांनी केलेले सूचक विधान. खासदार संजय राऊत यांनी मुंबंईमध्ये माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्यांनी महायुतीमध्ये समीकरणे बदलणार असून शिंदेंना धक्का देऊन भाजप सुनेत्रा पवारांना सोबत घेऊ शकतो अशी राजकीय भविष्यवाणी खासदार राऊतांनी केली.
हे देखील वाचा : Raj Thackeray यांची भावनिक श्रद्धांजली; आशाताईंची तुलना ‘रेनेसाँस’ कलाकारांशी, म्हणाले “एक युग संपलं…”
खासदार संजय राऊत यांनी बारामतीच्या निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले की,”भले, आज तुम्हाला मोदी आणि शाहांनी उभं केलं असेल पण जर पवारांनी जर बारामती उभी केली नसती तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतेच स्थान मिळाले नसते,शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का, तुम्ही कितीही मोठे झालात, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे आहात. याचा विसर पडता कामा नये. शरद पवारांची पुण्याई पाठीशी आहे. तुम्ही कितीही नाही म्हटलं, कितीही टाळण्याचा प्रयत्न केला, तरी पवारांची पुण्याई आहेच,” असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला.
हे देखील वाचा : आमदारांच्या डॉक्टर मुलीने वडिलांना जीवनदान दिले! DCM शिंदे म्हणाले, “अशी मुलगी केवळ नशिबानेच मिळते…”
वारसदार म्हणून सुनेत्रा पवारांची निवड
पुढे ते म्हणाले की, “हे बिनविरोध फक्त एका निवडणुकीपुरती आहे. पुढची निवडणूक बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक आम्ही अजित दादांना श्रद्धांजली म्हणून पाहत आहोत. अजित दादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, जर सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर तो भाजपचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस जर त्यांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदे ऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय, असं मला जाणवत आहे,” असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.






