mns amit Thackeray navi mumbai visit before mumbai bmc elections 2025
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिका, जिल्हापरिषद आणि इच्छुकांमध्ये उत्सुकता लागली आहे. सर्वात जास्त घडामोडी या मुंबईमध्ये सुरु आहेत. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे, यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे पक्ष तयारीला लागला आहे. यासाठी मनसेचे तरुण नेतृत्व राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मैदानात उतरले आहेत.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या सक्रीय राजकारणामध्ये उतरलेले दिसून येत आहे. यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील जोरदार लढत दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. मनसे पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला होता. महाराष्ट्रामध्ये एकही जागा मनसेची निवडून आली नव्हती. यानंतर पुन्हा एकदा मनसे पक्ष कामाला लागला असून मुंबई पालिकेसाठी जय्यत तयारी केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याच पार्श्वभूमीवर – मनसे युवा नेते अमित ठाकरे हे एक्शनमोडमध्ये आले आहे. अमित ठाकरे यांचा आज (दि.08) नवी मुंबई दौरा आहे. अमित ठाकरे नवी मुंबईत दाखल झाल्यानंतर मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. खारघर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी जमली होती. यावेळी अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. तसेच त्यांनी महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य असलेला ढोल वाजविण्याचा आनंद लुटला.
मनसे कार्यालयचे उद्घाटन
युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. तसेच थोड्याच वेळात अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील होणार आहे. यावेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते अमित ठाकरे यांच्या स्वागताला उपस्थित झाले होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे पक्ष मुंबई पालिकेसाठी तयारी लागला असून सध्या राजकारणामध्ये राज ठाकरे यांची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. ठाकरे बंधूंनी मतभेद विसरुन मराठी लोकांसाठी एकत्र यावे अशी इच्छा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रामधील अनेक मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाले असल्याचे देखील दिसून आले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर नाशिकमध्ये मोठा जल्लोष दिसून आला.
मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची युती हे राज्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट आणणार आहे. मुंबईसह राज्याच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. राज-उद्धव यांची युती ही मुंबई पालिकेच्या निवडणुकीवेळी भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. या युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामधये जे आहे ते होईल असे सूचक वक्तव्य केले होते. तर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रस्ताव आल्यानंतर विचार करु. यावेळी ताक देखील फुंकून पिऊ, अशी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वांना मनसे आणि ठाकरे गटाच्या या युतीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.