Amol Kolhe video explaining different ending of Swarajyarakshak Sambhaji series
शिरुर : सध्या छावा चित्रपट देशभरामध्ये धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला. यामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला असून महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या विरोधात ॲक्शन घेतली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कठोर भूमिका घेतली होती. विकिपीडियाची कॅलिफोर्नियास्थित असलेल्या नोडल एजन्सी विकिमीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून सदर आक्षेपार्ह मजकूर हटविण्यास सांगितले गेले आहे. तसेच चार जणांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आता अभिनेते आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ जारी करत प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह मजकूर टाकण्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. व्हिडिओ शेअर करत खासदार अमोल कोल्हे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोल्हे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली? हे जाणून बुजून केलेलं कारस्थान आहे का? की अनावधानाने घडलेली गोष्ट आहे? या पापाचे वाटेकरी कोण कोण आहेत? या षडयंत्राची मूळ कुठपर्यंत जातात? असे सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी विकिपीडिया या माहिती स्त्रोतावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत काही चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती टाकण्यात आली होती. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर देखील नाराजी व्यक्त करण्यात आली. यानिमित्ताने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एकेकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच विकीपीडीयावर असे आक्षेपार्ह माहिती टाकली जाते. तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की हे जाणून बुजून केलेलं कारस्थान आहे का? या आधी देखील या पद्धतीचे प्रयत्न करुन झाले आहेत. या पापाचे वाटेकरी कोण?” असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, “सध्या उजव्या विचारसरणीच्या काही अंध भक्तूल्यांना सोशल मीडियावर उन्मादी असा चेव चढला आहे. यांना या विषयावर बोलण्याचा खरंच नैतिक अधिकार आहे का? हे होऊ नये आणि ही माहिती सुधारली जावी यासाठी नेमकं काय करायला हवं. विकीपीडियावर अशा पद्धतीची चुकीची माहिती टाकणं हे मुद्दाम केलेले षडयंत्र आहे हे माझं मत आहे,” असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, “सध्या छावा चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल आहे. अशा वेळी अमराठी लोकांना छत्रपती संभाजी महाराजांविषयी फारशी किंवा पुरेशी माहिती नाही असे लोक नक्कीच माहिती मिळवण्यासाठी विकिपीडीयाचा वापर करतात. आणि हे लोक जेव्हा विकीपीडियावर जातील तेव्हा चुकीची माहिती दाखवली जाते आहे. वर्षानुवर्षे छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आली तीच पुन्हा लोकांच्या मनामध्ये परसवण्याचा प्रकार हा सुरु आहे. त्यामुळे हे षडयंत्र नाही तर काय आहे?” असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.