राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे.
अमरावती : मनसे नेते राज ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट झाली आहे. दादर येथील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिंदे गटाच्या नेत्याने अचानक ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागचे कारण देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर मत मांडले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेतील.आणि त्यावर निर्णय करतील,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच राज ठाकरे व उदय सामंत यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे यांचे सर्वांची चांगले संबंध आहेत.ते सर्वांचे मित्र आहे. त्यामुळे अशा किती होत असतात,” अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील मस्साजोगमध्ये जात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तर परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. याबाबत बावनकुळे म्हणाले की, “सुरेश धस यांनी भेटी घेतल्या पाहिजे. भेटी होत असतात. त्यात काही वेगळं नाही,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले आहे. बावनकुळे म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. शिंदे प्रल्गभ आणि महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत. ते महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करतात. एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये. रोधकांना नामोहर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी नेहमी केलं आहे. हिंदुत्वाचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करत आहेत. त्यामुळेच भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे. आता राजकारण नको लोकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करायची आहे,” असे स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
हा प्रश्न मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री सोडवतील
केंद्रीय मंत्री व भाजप नेते अमित शाह हे आज (दि.22) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महायुती सरकारच्या पुढाकाराने 20 लक्ष घर मंजूर झाली आहे. 20 लाख घरांचं आवर्तन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार 20 लाख घरांचा वाटप होणे हा आजचा ऐतिहासिक दिवस असणार आहे. सर्व लाभार्थ्यांना आज चेकचे वितरण केले जाईल. इथल्या दोन पालकमंत्र्यांचा प्रश्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून सोडवतील,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.