MP Shrikant Shinde aggressive over Operation Sindoor special session of Parliament
Shrikant Shinde Parliament speech : नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये कालपासून ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याबाबत माहिती दिली जात आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आहे. आज संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार भाषण केली आहे. त्यांना कॉंग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले. प्रियांका गांधी यांच्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते व खासदार श्रीकांत शिंदे हे बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र त्यानंतर 50 खोकेंच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी कविता सादर केली. तसेच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेलाही श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं ऑपरेशन सिंदूर हा केवळ सरकारचा तमाशा होता, असं विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी संसदेत बोलताना केलं होतं, त्यांच्या या विधानावरूनही खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली. तसेच श्रीकांत शिंदे संसदेत बोलत असताना विरोधकांनी ५० खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्याचं पाहायला मिळाले. यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे आक्रमक झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विरोधी पक्षातील काही खासदारांनी ५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या भाषणामध्ये अडथळा निर्माण झाला. यामुळे खासदार श्रीकांत शिंदे विरोधकांना सुनावताना ते म्हणाले की, “तुम्ही आता मॅच्युअर व्हा त्यातून (५० खोके एकदम ओके या घोषणेतून) बाहेर या. तुम्ही आता सभागृहात आहात देशाच्या संसदेत आलेला आहात. तुम्ही महापालिकेत नाहीत, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं, त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी बंद केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार श्रीकांत शिंदे यांनी इंटिलिजन्स फेल्युअर अशी टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिले आहे. खासदार शिंदे म्हणाले की, मला विरोधकांना विचारचे आहे की 2006 मध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्या बॉम्बस्फोटातील आरोपी कुठून आले होते. मुंबई हायकोर्टने त्या सर्व आरोपींची मुक्तता केली आहे. जेव्हा यांचे सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये होते त्यावेळी हा हल्ला झाला होता. तेव्हा 127 लोक मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणाचा शोध देखील यांचे सरकार घेऊ शकले नाही. याची जबाबदारी कोणाची? आणि आता हे संसदेमध्ये विचारत आहे की पहलगाममध्ये दहशतवादी आले कुठून? दहशतवादी आले पण त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.