MP Supriya Sule visited Parbhani and met the families of Somnath Suryavanshi and Vijay Vakode.
परभणी : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरण व परभणी प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना घेतले आहे. बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. तर परभणीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला. यानंतर अनेक राजकारण्यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. आता शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे.
मयत सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे म्हणाले की, “परभणी आणि बीडच्या घटना माणुसकीला लाजवणाऱ्या आहेत. परभणी आणि बीडची घटना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या कानावर घातली आहे. या दोन्ही घटनांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या दोन्ही घटनेत न्याय मिळावा यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. परभणीच्या घटनेमध्ये सरकार काहीतरी वेगळं बोलते आणि वास्तव वेगळं आहे. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या न्यायालयीन कोठडीमध्ये झाली आहे. सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमधील संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर देखील न्यायाची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मोक्का इतर आरोपींवर लावला असेल तर वाल्मिक कराडावर का लावला नाही? वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ईडीच्या केसमध्ये वाल्मिक कराड यांचे नाव एक नंबरला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीच्या नोटीस आल्यानंतर तात्काळ अटक झाली मग यांना का होत नाही? वाल्मिक कराड यांच्याकडे कोणाची माहिती आहे त्यामुळे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. ज्या ज्या मागण्या नेत्यांनी केले आहेत त्या बीड प्रकरणांमध्ये आरोप केले आहेत त्याचे उत्तर तपासले पाहिजे. देशमुख कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंब या प्रकरणात आम्हाला राजकारण करायचे नाही दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “बीड प्रकरणात जो आरोपी फरार आहे त्याला तात्काळ पकडले पाहिजे. धनंजय मुंडे यांनी माणुसकीच्या नात्याने आणि नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. पोलिसांना वाल्मिक कराड सापडले नाहीत ते का सापडले नाही पोलीस काय करत होते ते स्वत: शरण आले. वाल्मिक कराड कुठून येतो हे पोलिसांना माहित होत नाही. हे गृह खात्याचे नाही तर सरकारचे अपयश आहे. राज्याने या सरकारला एवढे मोठे बहुमत दिले आहे त्याचा सरकारने काहीतरी विचार करायला पाहिजे,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.