संसदेत राजस्थान खासदारांची ऑपरेशन सिंदूरवर टीका (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान, राजस्थानच्या नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. PTI ने दिलेल्या माहितीनुसार हनुमान बेनीवाल यांनी सोमवारी (२८ जुलै) लोकसभेत सरकारवर आगपाखड केली आणि यावेळी म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ ८ मे च्या रात्री सुरू झाले. ते दोन दिवस चालले. तुम्ही म्हणालात की पाकिस्तान गुडघे टेकून आला. म्हणजे नक्की काय आहे ऐकताना असे वाटत होते की भारत पाकिस्तानच्या भांगेत सिंदूर भरत आहे. भारताने पाकिस्तानच्या आत सिंदूर भरले असेही वाटतेय आणि त्यामुळेच पाकिस्तान हा आता भारताची पत्नी बनला. फक्त आता नवरीची पाठवणी उरली आहे आणि आता ती पण तुम्ही करून या’ अशा परखड शब्दात आपले मत मांडत सरकारची कानउघडणी केली आहे.
भारतात दहशतवाद नवीन नाही – बेनीवाल
बेनीवाल पुढे म्हणाले, “भारतात दहशतवाद नवीन नाही. तो काँग्रेसच्या काळात होता, तो भाजपच्या काळातही आहे.” ते असेही म्हणाले, “सदनाचे कामकाज सलग पाच दिवस विस्कळीत होते. संपूर्ण देश पाहत होता. ही चर्चा पहिल्याच दिवशी व्हायला हवी होती, मग पाच दिवस विस्कळीत का व्हावे? संपूर्ण देशाला वाटले की ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा व्हावी.” आपल्या व्यवस्थेत काहीतरी दोष असावा असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
नागौर येथील ‘भारत’ आघाडीचे खासदार असेही म्हणाले की, ”पहलगाममध्ये धर्म विचारून लोकांची हत्या करण्यात आली. हे अत्यंत निंदनीय कृत्य होते. ज्यांनी ही बातमी पाहिली त्यांनी म्हटले की आपण आजही सुरक्षित नाही. आपल्या व्यवस्थेत काहीतरी दोष असावा. दहशतवादी तिथे कसे पोहोचले? तिथे इतके पर्यटक येतात, मग सुरक्षा व्यवस्था काय होती?
‘पाणी आणि रक्त एकत्र नाही, पण क्रिकेट मात्र…’ ऑपरेशन सिंदूरबाबत Owaise चा मोदी सरकारला सवाल
पहलगाम हल्ल्यानंतर किती वेळात मदत पोहोचली?
हनुमान बेनीवाल यांनी पुढे विचारले की, ”हल्ल्यानंतर पहलगाममध्ये किती वेळात मदत पोहोचली? त्या दिवशी संपूर्ण देश रडला.” सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, ”तुम्ही म्हणत होता की तुम्ही पीओके ताब्यात घ्याल. तुम्ही २०१४, २०१९ मध्ये हे सांगितले होते आणि २०२४ मध्येही. प्रत्येक भारतीयाच्या मनात होते की यावेळी पाकिस्तानशी कारवाई केली जाईल.” इतकंच नाही तर घुसखोरी कशी झाली याची चौकशी झाली पाहिजे असेही यावेळी हनुमान बेनीवाल यांनी स्पष्टपणे विचारणा केली आहे.
लोकसभेत चर्चेदरम्यान त्यांनी विचारले, ”घुसखोरी कशी झाली याची चौकशी झाली पाहिजे, देशाला हे जाणून घ्यायचे आहे. अग्निवीर योजनेमुळे सैन्याचे मनोबल घसरले आहे. हे थांबवा, मी ज्या जातीतून बहुतेक लोक सैन्यात सामील होतात त्या जातीचा आहे. व्यावसायिकांना सैन्याबद्दल काय माहिती आहे. आपण सर्वजण सैन्याला सलाम करतो. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार का हे पहावे लागणार आहे.