Narhari Zirwal video case: नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट; तृतीयपंथी व्यक्तीची थेट पोलीस ठाण्यात धाव
Narhari Zirwal video case: विधानसभेचे उपाध्यक्ष, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. नरहरी झिरवाळ यांच्यासोबत दिसणारी तृतीयपंथी व्यक्तीने स्वत:च्या भावाविरूद्धच मुंबई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीने मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात भावाविरोधात ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
झिरवळांना यावेळीही माफी की राजीनामा? CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिली …
तृतीयपंथी व्यक्तीच्या भावाने तिला ब्लॅकमेल करण्यासाठी मूळ व्हिडीओ जाणीवपूर्वक एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. असा आरोप तृतीयपंथी व्यतीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संविधानांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोपनीयतेचा भंग आणि बदनामी केल्याचा आरोप आहे.
दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांनीदेखील हा व्हिडीओ बनावट असून तो अनेक क्लिप्स जोडून तयार केल्याचा दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कायदेशीर पावले उचलली आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू असून व्हायरल व्हिडिओचा मूळ स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. पण या नव्या ट्विस्टमुळे झिरवाळ यांच्यासाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये एक मंत्री झिरवाळ मांस आणि दारुचे सेवन करताना दिसत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे झिरवाळ एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. हा संपूर्ण प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाला असल्याचे बोलण्यात आले. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव पवन यादव असे असून तो तृतीयपंथी असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रसारित झालेली ही चित्रफीत सुमारे सात महिन्यांपूर्वीची असल्याचे बोलले जात आहे. शासकीय निवासस्थानातील या दृश्यांमध्ये तृतीयपंथी पवन यादव हा झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर बसलेला दिसत आहे. तसेच त्यांच्या शेजारी खाद्यपदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसून येत आहेत. एका लोकप्रतिनिधीच्या शासकीय निवासात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती अशा परिस्थितीत दिसल्याने नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.






