Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Mandir Trust First CEO: कोण होणार अयोध्या राम मंदिर ट्रस्टचा पहिला CEO; माजी IAS अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर!

Ram Mandir Trust First CEO: राम मंदिरासाठीच्या देणग्यांमध्ये अनियमितता उघडकीस आल्यानंतर मंदिर ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी अलीकडेच राजीनामा दिला. दरम्यान, ट्रस्टचे सदस्य विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांचे निधन झाल्याने ही तीन पदे रिक्त झाली.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 02, 2026 | 03:59 PM
राम मंदिरात १०५ वेळा दानचोरी

राम मंदिरात १०५ वेळा दानचोरी

Follow Us
Follow Us:
  • अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (CEO) आज घोषणा होणार
  • सीईओ पदासाठी माजी IAS दिनेश चंद्र आणि माजी IAS योगेश्वर मिश्रा शर्यतीत
  • एकूण ५,५८५ अर्जांमधून १६ जणांच्या मुलाखतीनंतर अंतिम उमेदवारांची यादी तयार
Ayodhya Ram Mandir Trust First CEO: उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्री राम मंदिर ट्रस्टच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या (CEO) नावाची आज (02 सप्टेंबर) घोषणा होण्याची शक्यता आहे. सीईओ पदासाठी सहा संभाव्य नावांची यादी तयार करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, माजी आयएएस अधिकारी दिनेश चंद्र आणि माजी आयएएस अधिकारी योगेश्वर मिश्रा यांचा संभाव्य सीईओंमध्ये समावेश आहे. निवड समितीने यापूर्वी १६ अर्जदारांची निवड करून त्या सर्वांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यापैकी आता सहा जणांची निवड करण्यात आली आहे. ही नावे ट्रस्टकडे पाठवण्यात आली असून, अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

मणिरामदास छावणीतील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांच्या निवासस्थानी बुधवारी होणाऱ्या बैठकीत मंदिराच्या पहिल्या सीईओच्या निवडीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. निवड समितीचे सदस्य, निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि तज्ज्ञ सदस्य सुरेश हावरे हे अयोध्येत दाखल झाले आहेत.

Maharashtra Band: मराठा आरक्षणामुळे राजकारण तापणार; उद्या ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद!

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी एकूण ५,५८५ अर्ज

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१ सप्टेंबर) सांगितले, “श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाच्या निवडीसाठीची सर्वसमावेशक, पारदर्शक आणि तंत्रज्ञान-आधारित प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ५,५८५ अर्जांचे पुनरावलोकन केल्यानंतर, १६ उमेदवारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर, निवड समितीने तीन अत्यंत पात्र उमेदवारांची अंतिम यादी ट्रस्टला सादर केली. अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा ट्रस्टतर्फे केली जाईल.”

चंपत राय यांच्या राजीनाम्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती

राम मंदिरासाठीच्या देणग्यांमध्ये अनियमितता उघडकीस आल्यानंतर मंदिर ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी अलीकडेच राजीनामा दिला. दरम्यान, ट्रस्टचे सदस्य विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांचे निधन झाल्याने ही तीन पदे रिक्त झाली.

Disha Salian case: दिशा सालियन मृत्यूचे गूढ उकलणार; मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआय चौकशीची मंजुरी

ट्रस्टचे सदस्य आणि महासचिव यांचीही निवड

सूत्रांनुसार, ट्रस्टमधील तीन रिक्त पदांसाठी (दोन सदस्य आणि महासचिव) बुधवारी नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ट्रस्टचे सदस्य विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांच्या निधनामुळे आणि अर्पणाच्या कथित चोरीप्रकरणी मंदिराचे माजी महासचिव चंपत राय व अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यामुळे ही तीन पदे रिक्त झाली होती.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनुसार, जगदीश आफळे हे मंदिर ट्रस्टचे पहिले सचिव असतील. महाराष्ट्राचे रहिवासी असलेले आफळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असून राम मंदिर बांधकाम प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक आहेत.

 

 

Web Title: National newsayodhya ram mandir trust to announce first ceo today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • ayodhya
  • ram mandir

संबंधित बातम्या

Diwali Special: १४ वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत परतले, तेव्हा नगरीत कसा साजरा झाला दीपोत्सव
1

Diwali Special: १४ वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत परतले, तेव्हा नगरीत कसा साजरा झाला दीपोत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.