Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर; ‘त्या’ हेलिकॉप्टरमधून करणार होते प्रवास, पण…

पुण्यामध्ये बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर क्रश झाले. पुण्यामध्ये हेलिकॉप्टर क्रश होण्याची ही दुसरी वेळी आहे, या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे घ्यायला जाणार होते. सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते

  • By प्रीति माने
Updated On: Oct 02, 2024 | 11:33 AM
Pune Helicopter Crash News in Bavdhan Budruk

Pune Helicopter Crash News in Bavdhan Budruk

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. शहरातील बावधन बुद्रुक गावाजवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये तीन जणांनी आपला जीव गमावला आहे. ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झाले असून मदतकार्य सुरु आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण घेतल्यानतंर अवघ्या तीन मिनिटातच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे या अपघातग्रस्त विमानाने प्रवास करणार होते, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन आज सकाळी 7.30 वाजता एका हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. त्यानंतर हेलिकॉप्टर मुळशी भागातील डोंगराळ परिसरातून उड्डाण घेत होते. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात दाट धुके पसरले आहे. या धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर थेट दरीत कोसळले, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. हे हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे होते. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हा अपघात झाला.

हे देखील वाचा : पुण्यात हेलिकॉप्टर क्रॅश,तिघांचा मृत्यू

पुण्यामधील हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र त्यापूर्वीच पुण्यामध्ये या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. काल देखील (दि.01) सुनील तटकरे यांनी याच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. विशेष म्हणजे सुनील तटकरे हे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते आणि त्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. यानंतर सुनील तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले. हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना नेण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र त्यापूर्वीच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. तटकरे यांना घेऊन ते हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. मात्र सकाळीच हे हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

Web Title: Ncp mp sunil tatkare will travelling helicopter crashed near bavdhan budruk pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • helicopter crash

संबंधित बातम्या

Helicopter Crash : अमेरिकेत पुन्हा मोठी दुर्घटना ; मिसिसिपी नदीत कोसळले हेलिकॉप्टर
1

Helicopter Crash : अमेरिकेत पुन्हा मोठी दुर्घटना ; मिसिसिपी नदीत कोसळले हेलिकॉप्टर

Watch : हेलिकॉप्टर हवेतून थेट नदीत कोसळले! अपघाताचा थरारक VIDEO सोशल मीडियावर VIRAL
2

Watch : हेलिकॉप्टर हवेतून थेट नदीत कोसळले! अपघाताचा थरारक VIDEO सोशल मीडियावर VIRAL

Kedarnath Helicopter Crash : चार धाम यात्रेतील हेलिकॉप्टर प्रवास ठरतोय जीवघेणा; यात्रेकरुंनी विचार करण्याची गरज
3

Kedarnath Helicopter Crash : चार धाम यात्रेतील हेलिकॉप्टर प्रवास ठरतोय जीवघेणा; यात्रेकरुंनी विचार करण्याची गरज

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथ अपघातामध्ये महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबाचा अंत; मुख्यमंत्र्याांकडून शोक व्यक्त
4

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथ अपघातामध्ये महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबाचा अंत; मुख्यमंत्र्याांकडून शोक व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.