Photo Credit- Social Media
Pune Helicopter Crash News: पुण्यातील बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळले. ही घटना सकाळी 7.00 ते 7.10 च्या दरम्यान घडली. या भागात दाट धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, अपघाताची नेमकी माहिती मिळविण्यासाठी अधिकृत तपास सुरू आहे. आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. हिंजवडी पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड पोलीस) आणि विमान वाहतूक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
हेही वाचा: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; ‘या’ महिला नेत्याचा राजीनामा
ऑगस्ट 2024 मध्येही पुण्यात हेलिकॉप्टर अपघाताची घटना समोर आली होती. ज्यात चार जण जखमी झाले. हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहू येथून हैदराबादच्या दिशेने उड्डाण केले. याचदरम्यान, खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टरला अपघात झाला. अपघातात बळी पडलेले हेलिकॉप्टर ग्लोबल वेक्ट्रा हेलिकॉप्टर या खासगी कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जात होते.
अपघातामुळे हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर त्यालाही आग लागली. तेथे हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. पायलट आनंद हे हेलिकॉप्टर चालवत होते. या अपघातात पायलटसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळाजवळ स्थानिक लोक जमा झाले होते. यावेळी प्रशासनाने सर्व लोकांना शांतता राखण्याचे आणि मदतकार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा: 3 महिन्यांसाठी मिळणार Free Internet, ही कंपनी देत आहे Jio-Airtel’ला टक्कर