Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dance Bar : ‘…तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी मैदानात उतरू’; डान्सबारवर बंदी घालणाऱ्या आर. आर. आबांच्या मुलाचा इशारा

आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना, 2005 मध्ये डान्सबार बंदी घातली होती. मात्र डान्सबार कायदा सुधारणेबाबत राज्य मंत्रिमंडळात आज चर्चा झाली असून सरकार पुन्हा डान्सबार सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 18, 2025 | 09:12 PM
...तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी मैदानात उतरू? डान्सबारवर बंदी घालणाऱ्या आर. आर. आबांच्या मुलाचा इशारा

...तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी मैदानात उतरू? डान्सबारवर बंदी घालणाऱ्या आर. आर. आबांच्या मुलाचा इशारा

Follow Us
Follow Us:

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना, 2005 मध्ये डान्सबार बंदी घातली होती. मात्र डान्सबार कायदा सुधारणेबाबत राज्य मंत्रिमंडळात आज चर्चा झाली असून सरकार पुन्हा डान्सबार सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. मात्र सरकारच्या या चर्चेवरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटल यांनी सरकारला इशारा दिला आहे. जर सरकार डान्सबार सुरू करण्याचा घाट घालत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरु असा त्यांनी दिला आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

2005 मध्ये डान्सबार बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता तब्बल २० वर्षांनी राज्यात पुन्हा एकदा छमछमचा आवाज घुमण्याची शक्यता आहे. डान्सबार सुरू करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. डान्सबारसंबंधी नवीन कायद्यावर चर्चा झाल्याची माहिती असून लवकरच हा कायदा विधानसभेत मांडला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकार जुन्या कायद्यात सुधारणा करून नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.

यावर आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरू असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने 2005 मध्ये राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तशी घोषणा केली होती. आर. आर. पाटील यांच्या या निर्णयाचे राज्यात जोरदार स्वागत झाले होते. मात्र, डान्सबार मालकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये ही बंदी उठवत काही नियम लागू करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आता राज्य सरकार नियमात बदल करून डान्सबार सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.

Web Title: Ncp sharad pawar group mla rohitpatil warns government on dance bars open marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 09:12 PM

Topics:  

  • Dance Bar
  • Maharashtra Cabinet Decision
  • Rohit Patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.