OBC leader Laxman Hake target Sharad Pawar attacked on car Maharashtra political news
Laxman Hake in Beed : बीड : राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये लाखो समर्थकांसह येण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके संताप व्यक्त करत आहेत. लक्ष्मण हाके यांच्यावर बीडमधील नेते शिवराज बांगर यांनी निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील प्रवक्ते व नेते शिवराज बांगर यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधला आहे. शिवराज बांगर म्हणाले की, “ओबीसींसाठीचे योगदान पाहता लक्ष्मण हाकेंला फार काही महत्त्व द्यावं अशी त्याची परिस्थिती नाही. कोणीही मनोज जरांगे पाटलांना स्पॉन्सर करावं एवढं काही आंदोलन ते लहान नाहीये. लक्ष्मण हाकेंला कोण स्पॉन्सर करतंय हे अख्या महाराष्ट्राने पाहिलंय लक्ष्मण हाके यांना पैसे घेताना लोकांनी पाहिलंय, ओबीसींच्या इतर नेत्यांवर टीका करताना लोकांनी पाहिलंय,” अशा शब्दांत शिवराज बांगर यांनी टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लक्ष्मण हाके हा राजकारणातला राखी सावंत
पुढे शिवराज बांगर यांनी लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवरती टीका करणे हे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. हे उद्योग लक्ष्मण हाकेंनी करू नयेत ही त्यांना विनंती आहे.लक्ष्मण हाके हे काही ओबीसीचा नेता नाही. लक्ष्मण हाकेंच्या बैठकीला शंभरपेक्षा कमी लोक होते. त्यामध्ये 80 टक्के लोक हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे बचाव गॅंगचे होते. वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी ज्यांनी मोर्चे काढले उपोषण केले ते लोक या बैठकीत होते. लक्ष्मण हाकेचं जे रिचार्ज आहे ते परळीहून होतं. लक्ष्मण हाके हा राजकारणातला राखी सावंत. लक्ष्मण हाके हा राजकारणातला उर्फी जावेद आहे,” अशी गंभीर टीका शरद पवार गटाचे शिवराज बांगर यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हा माणूस बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आलेला
शिवराज बांगर म्हणाले की, “माझी विजयसिंह पंडित यांना विनंती आहे प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला सोडून दिलं पाहिजे. मराठा-ओबीसी आणि ओबीसी-ओबीसी मध्ये वाद लावायचं काम लक्ष्मण हाकेंनी करू नये. हा माणूस बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आलेला आहे. त्याला बीड जिल्ह्यामध्ये बंदी घालावी अशी प्रशासनाला विनंती,” अशी मागणी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केली आहे.