मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असलेल्या 'कोल्हापूर गॅझेट'ची अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरील कायदेशीर लढाईसाठी बुधवारी खंडेनवमीच्या मुहूर्तावर कोल्हापुरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात विशेष शस्त्र पूजन करण्यात आले.
आपण गावगाड्यावरील सर्व जाती-धर्मांबरोबर घेऊन जाणारे आहोत. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तोच विचारलं मांडला, अशा भूमीत हा मराठा मेळावा होत असून, हे आपले भूषण आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळत उपोषण मागे घेतले आहे. सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करून मराठा आरक्षणाचा जीआर (शासकीय निर्णय) काढला आहे.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. गेले चार दिवस राज्यभरातून मराठे मुंबई कडे येत आहेत. काल न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईतून आंदोलकांना…
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला चारपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. असे असताना सरकारकडून मागण्यांचा विचार केला गेला नाहीतर पाच कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार असल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
विनोदी अभिनेता कपिल शर्माची ऑन-स्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीने रविवारी मुंबईच्या रस्त्यावर तिच्यासोबत घडलेल्या एका भयानक घटनेचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीची गाडी थांबवण्यात आली आणि तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणावर असताना सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नसल्याचेसांगितले. परतत असताना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली.
मराठा आरक्षणाच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याऐवजी सध्याच्या ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याचा लाभ द्या.
सरसकट आरक्षण शक्य नाही. ज्यांच्याकडे आवश्यक दस्तऐवज आहेत, त्यांनाच ओबीसींचा लाभ मिळेल. सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे आणि ती कायम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न करत खरमरीत उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत असताना मराठा समाजासाठी काय केले?
अमरावतीत काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी मराठा आरक्षणावर ठाम भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन येणाऱ्या काळात दडपले जाईल, असा दावा केला आहे.
ट्रक, टेम्पो, जीप आणि चारचाकींतून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने आले आहेत. मुंबईत गुरुवारी दुपारपासूनच आंदोलकांची गर्दी सुरू झाली. मनोज जरांगे यांच्या ताफ्यात शेकडो वाहने आहेत.
नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाची बैठक पार पडली. उद्या हजारों आंदोलक मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करतील. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे.