Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सैफ अली खान एवढ्या लवकर बरा कसा झाला? भाजप नेत्यांना वेगळाच संशय; बावनकुळेंनी मांडले मत

अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोराने धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये सैफ गंभीर जखमी होऊन त्याच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली. यावर भाजप नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 23, 2025 | 02:26 PM
Nitesh Rane expressed doubts over Saif Ali Khan's early treatment

Nitesh Rane expressed doubts over Saif Ali Khan's early treatment

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बॉलीवुड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला. या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हल्लेखोराने सैफ अली खानवर सहा वेळा धारदार शस्त्राने हल्ला केला. तसेच पाठीमध्ये मोठा चाकूचा तुकडा अडकल्यामुळे सैफ अली खानवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र रुग्णालयातून लगेचच डिस्चार्ज मिळाल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. यावर आता भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांनी सैफ अली खानवरील उपचार लवकर संपल्यामुळे संशय व्यक्त केला होता. यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सैफ अली खानवर डॉक्टरांनी केलेल्या उपचारांवर संशय घेऊ नये. मात्र इतर नेत्यांनी उपस्थित केलेल्या संशयाला वाव असल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावरुन आणि लवकर उपचार झाल्यावरुन नवीन वादाला तोंड फुटले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

काय म्हणाले होते नितेश राणे?

आमदार नितेश राणे यांनी एका भाषणामध्ये सैफ अली खानवरील हल्ला आणि उपचार यावर संशय व्यक्त केला होता. मुंबईमध्ये काय सुरु आहे. त्या सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला झाला. बांगलादेशी हल्लेखोराने हा हल्ला केला. पहिले फक्त नाक्यावर उभे राहत होते. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घ्यायला आले असतील. ही घाण लेके जाओ म्हणत असतील. तो असा रुग्णालयातून चालत आला मलाच संशय आला. ह्याला काय खरंच चाकू मारला आहे की असंच एक्टिंग करुन बाहेर निघाला आहे. टुणटुण करुन नाचत आहे तो, अशा शब्दांत नितेश राणे यांनी संशय व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

बॉलीवुड अभिनेता सैफ अली खानवर हल्लेखोराने हल्ला केला. सहा वेळा चाकूने वार करुन सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याला रिक्षाने तातडीने लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर पाठीमध्ये घुसलेल्या चाकूचा तुकडा काढून शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफ अली खानवर हल्ला केलेल्या हल्लेखोर हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे समोर आले आहे. त्याने अवैधपणे भारतामध्ये प्रवेश करुन एका बारमध्ये नोकरी देखील केली. या हल्लेखोराने एक कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र आता भाजपच्या अनेक नेत्यांनी सैफ अली खानवर एवढी गंभीर जखम असून एवढ्या लवकर उपचार कसे झाले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. संजय निरुपम, नितेश राणे त्याचबरोबर माजी खासदार किरिट सोमय्या यांनी देखील संशय व्यक्त केला आहे.

Web Title: Nitesh rane expressed doubts over saif ali khan early treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Nitesh Rane
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
1

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं
2

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं

”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव
3

”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव

Nitesh Rane : गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावं, नितेश राणेंचे आदेश
4

Nitesh Rane : गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावं, नितेश राणेंचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.