Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नितेश राणे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कडवा नेता” ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

आमदार नितेश राणे निवडून येणारच, नेमंक काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जाणून घ्या..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 17, 2024 | 11:56 AM
नितेश राणे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कडवा नेता ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

नितेश राणे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कडवा नेता ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली/ भगवान लोके:  कणकवली म्हणजे राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला. आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभेतून निवडून येणारच, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत राज्यात प्रचारसभा सुरु आहेत. याचपार्श्वभूमीवर महायुतीची सभा कणकवलीत आयोजित करण्यात आली. या सभेसाठी उपस्थित राहावं अशी विनंती नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली होती. याबाबात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माध्य़मांसमोर या सभेबाबात खुलासा केला आहे.

सभेला हजर न राहू शकल्याचा केला खुलासा

महायुतीसंदर्भात बातम्यांसाठी इथे  क्लीक करा

कणकवलीत होणाऱ्या महायुतीच्या प्रचारसभेबाबत बोलताना देवेद्र फडणवीस म्हणाले की, कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार,माझे मित्र नितेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते, मात्र हवामान खात्याने अनुकूलता न दर्शवल्यामुळे ऐनवेळी मला सभा रद्द करावी लागली. असेही येथे जेथे नितेश राणे हे नाव येते, तिथे तिथे हवामान बदलण्याची ताकद या नेत्यांमध्ये आहे, आणि स्वतः नारायण राणे तिथे असल्याने माझ्या प्रचाराची तशी गरज पण नाही.

पुढे देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, नितेश यांनी केलेलं जे काम आहे, ते कामच त्यांना निवडून आणण्याकरता पुरेसे आहे.कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, मी त्यांना म्हटलं की, तुम्ही निवडून तर येणारच आहात. मग माझी एक सभा वाया कशाला घालवता ?पण त्यांनी प्रेमापोटी आग्रह केल्याने मी नाही म्हणू शकलो नव्हतो. असो सभा रद्द झाली, तरी माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी कायम आहेत .आमदार नितेश राणे हिंदुत्ववादी महाराष्ट्रातील कडवा नेता आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्य़ावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“नितेश राणे हे नव्या रक्ताचे हिंदुत्ववादी”- देवेंद्र फडणवीस

निवडणुकीच्या बातम्यांसाठी इथे क्लीक करा 

याव्यतिरीक्त पुढे देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, आमदार नितेश राणे हे नव्या रक्ताचे हिंदुत्ववादी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.विधानसभेतील त्यांची भाषणं अभ्यासपूर्वक आहेत. संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचे त्यांनी केलेलं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.त्यांना विजयासाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. कणकवली मतदारसंघातील सर्व मतदारांना माझे विनम्र आवाहन आहे की, मोठ्या मताधिक्याने नितेश राणे यांना निवडून द्या. संघटित शक्तीसाठी राणे विधानसभेत असलेच पाहिजे. तसंच नितेश राणेना आमदारकीच्या हॅट्रिकसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणाला मिळणार जनतेचा कौल ?

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील लढत अतीतटीची होत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे भाजपा महायुतीचे नितेश राणे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे संदेश पारकर उभे आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत कणकवलीकर कोणाला कौल देणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता कणकवलीत येणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

 

Web Title: Nitesh rane is a hindutva bitter leader in maharashtra deputy chief minister devendra fadnavis statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 11:49 AM

Topics:  

  • DCM Devendra Fadanvis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वीज अन् वीजबीलाबाबत CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वीज अन् वीजबीलाबाबत CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

IAS Transfer : फडणवीस सरकारकडून 6 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांचं प्रमोशन
2

IAS Transfer : फडणवीस सरकारकडून 6 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांचं प्रमोशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.