
'सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहरासाठी मतदान करा'; नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क (Photo Credit- X)
नागपूरमध्ये मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “मला पूर्ण विश्वास आहे की भाजपचा विजय होईल. नागपूरला सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त बनवण्याचे आमचे स्वप्न नक्कीच साकार होईल.” यावेळी त्यांनी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचाही संदर्भ दिला. “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा विशेष अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे,” असे गडकरींनी नमूद केले.
#Watch | Union Minister Nitin Gadkari shows his inked finger after casting his vote at a polling station in Nagpur for Maharashtra local body polls#BMCElections #BMCElections2026 pic.twitter.com/xyf3Fa7Ptq — NDTV (@ndtv) January 15, 2026
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सहकुटुंब मतदान केले. विकसित आणि सुरक्षित मुंबईच्या निर्माणासाठी सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेऊन मी मतदानाचा हक्क बजावला, असे त्यांनी सांगितले. तर, भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुंबईतील मतदान प्रक्रियेवर समाधान व्यक्त केले. सुव्यवस्थित नियोजनाबद्दल त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगरानी यांचे अभिनंदन केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मतदान केले. यावेळी त्यांनी आचारसंहिता भंगाचे सर्व आरोप फेटाळून लावले. “राज्य निवडणूक आयोगाने मला क्लिन चिट दिली असून सर्व आरोप निराधार आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी स्वतः मतदान केल्यानंतर केंद्रांवरील सोयीसुविधांचा आढावा घेतला. मुंबईतील सर्व केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावली आणि वृद्धांसाठी मदतनीस तैनात आहेत. पोलीस दलाच्या चोख बंदोबस्तात प्रक्रिया शांततेत सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.