पाडू यंत्राचे गूढ आणि दुबार मतदारांवरून राज ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
Raj Thackeray on BMC Election 2026 News Marathi : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. ३४.८ दशलक्ष मतदार १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील, ज्यात मुंबईतील १,७०० आणि पुण्यातील १,१६६ उमेदवारांचा समावेश आहे. सहा वर्षांहून अधिक काळानंतर २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने निवडणूक लढवत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी दादरमधील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला असून यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
सध्या निवडणुकांबाबत एक प्रकारचा छळ सुरू आहे, हे आपण सर्वजण पाहात आहे. निवडणुका कशा जिंकायच्या हे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. जेव्हा आम्ही पुन्हा मतदानाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा निवडणूक आयोगाने म्हटले की आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. निवडणुकीनंतर पुन्हा आम्ही व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला. व्हीव्हीपॅट मशीन नसताना, तुमचा उमेदवार निर्भयपणे मतदान करत आहे की नाही हे तुम्हाला माहित नव्हते. या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाना पाडू यंत्र आणले. हे पाडू यंत्र मतमोजणीवेळी वापरले जाणार आहे.सरकारने ठरवलेच आहे. विरोधी पक्ष नावाची गोष्ट शिल्लक ठेवायची नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने कोणत्याही सरकारी पक्षाला पाडू यंत्र दाखवलेले नाही. निवडणूक आयोग या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती देत नाही. आधी मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावली जायची. पण आता मार्करने मतदारांच्या बोटावर खूण केली जात आहे. मार्करने लावलेली शाईसॅनिटायझरने हात धुतल्यानंतर पुसली जात आहे. याशिवाय, निवडणूक आयोगाने राज्य पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या प्रचार कालावधी संपल्यानंतर शेवटच्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन मतदारांना भेटण्याची संधी दिली. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना फक्त पैसे वाटण्याची संधी देण्यात आली. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी अशा प्रकारे कामाला लागले. आम्ही हे सगळे रोखण्यासाठी काम करत आहेत. पण या सगळ्या गोष्टी चांगल्या लोकशाहीची लक्षणे नाहीत. सत्तेत येण्याला विजय म्हणत नाही, अशा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. तसेच बाहेर या, शाई पुसा, परत आत जा, मतदान करा, बाहेर या शाई पुसा परत आत जा, याला विकास म्हणतात का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
आज सकाळी दादरच्या छबिलदास येथील मतदान केंद्रावर दुबार मतदार पकडला गेला. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांनी दिवसभर सतर्क राहून यावर लक्ष केंद्रित करावे. सत्तेच्या गैरवापरला मर्यादा असायला पाहिजेत. भाजपचे नेते विकासाची भाषा करत आहेत. पण शाई पुसून पुन्हा मतदानाला जायचे, याला विकास म्हणायचे का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.






