
बिहारमध्ये एनडीएला मिळाले बहुमत
नितीश कुमार यांना सोडावे लागले गृहमंत्रीपद
भाजप ठरला राज्यातील सर्वात मोठा पक्ष
Bihar Assembly Election 2025: नुकतीच बिहार विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एनडीएने प्रचंड बहुमत प्राप्त केले. एनडीएमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने जागा जिंकल्या. नितीश कुमार हे बिहारचे 10 व्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र 20 वर्षांपासून आपल्या ताब्यात असलेले गृहमंत्रीपद त्यांना सोडावे लागले.
नितीश कुमार मुख्यमंत्री झाले असले तरी देखील बिहारच्या राजकारणात भाजपची पकड दिसून येत आहे. गुरुवारी नितीश कुमार यांच्यासोबत 26 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 14 भाजपचे तर 8 जेडीयूचे मंत्री आहेत. मंत्र्यांना खातेवाटप देखील झाले आहे. यामध्ये सगळ्यात विशेष गोष्ट घडली. ती म्हणजे बिहारचे गृहमंत्रालय हे भाजपच्या वाट्याला आले आहे.
गेल्या 20 वर्षांपासून नितीश कुमार बिहारचे गृहमंत्रालय सांभाळत आहेत. आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे बिहारचे नवीन गृहमंत्री असणार आहेत. या आधी भाजप कमी आणि जेडीयू सारवाढीक जागा लढत असे. मात्र यंदा भाजप आणि जेडीयू पक्ष समसमान जागा लादले. त्यामुळे यावेळेस लहान भू , मोठा भाऊ असे गणित दिसून आले नाही.
नितीश कुमार आहेत फॉर्म्युला मास्टर
नितीश कुमार यांना सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद मिळाले आहे हे केवळ त्यांच्या लोकप्रियतेमुळे नाही तर ते राजकीय फॉर्मूला मास्टर आहेत. सध्या, भारताच्या निवडणूक राजकारणाचे सूत्र एका नवीन संक्रमणातून जात असल्याचे दिसते. भारतीय लोकशाहीच्या निवडणूक प्रवासात नवीन ट्रेंड उदयास येत आहेत. पूर्वी, पक्ष मागास जाती, दलित, उच्च जाती आणि अल्पसंख्याक मुस्लिमांवर आधारित मतदारांचे नकाशे तयार करत असत; आता, त्या वर्गीकरणात तफावत येऊ लागली आहे.
नितीश कुमार आहेत फॉर्मूला मास्टर! बिहारचे 10 व्यांदा मुख्यमंत्री होऊन बनले किंगमेकर
आता तीन प्रमुख राजकीय विभागांवर प्रकाश टाकला जात आहे: शेतकरी, तरुण आणि महिला. महिला हा सर्वात प्रमुख राजकीय विभाग आहे. शेतकरी आणि तरुण हे राजकीय पक्षांसाठी भावनिक क्षेत्र होते, परंतु आता महिला मतदार गट एक प्रमुख राजकीय क्षेत्र म्हणून उदयास आला आहे, कारण ते लोकसंख्येच्या अर्ध्या भागाचे आहेत. महिलांना उपजीविकेच्या नावाखाली, तरुणींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या स्वरूपात किंवा मुलीच्या लग्नासाठी मासिक किंवा एकरकमी भत्ते देण्याची स्पर्धा आहे.