Parimay Phuke alleges agents taking money for lakhshyavedhi in maharashtra legislature
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. मात्र विधीमंडळामध्ये लक्षवेधी देण्याची पैसे द्यावे लागत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी विरोधकांनी अशी टीका केली होती. मात्र आता सत्ताधारी नेत्याने देखील असा आरोप केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
भाजपा आमदार परिणय फुके यांनी विधीमंडळामध्ये एजंट्सकडून नेते पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्ताधारी आमदार फुके यांनी यासंदर्भातील पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप देखील सर्वांमध्ये सादर केली आहे. विधानसभेत प्रश्न का लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल यासंदर्भातील धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहेत. फुकेंकडून एजंट्सकडून पैशांचे व्यवहार सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यामुळे महायुती सरकारला घराचा आहेर मिळाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत तक्रार करताना भाजप आमदार परिणय फुके म्हणाले, “2023 मध्ये तत्कालीन मंत्र्याने यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. मी प्रामुख्याने तीन-चार राईस मिलसंदर्भात सांगतोय. या कारखान्यांना घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये क्लीन चिट देण्यात आली आहे. काल विधानसभेमधील प्रश्नोत्तराच्या तासांत यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा प्रश्न मांडण्याच्या दोन दिवस आधीची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे.” असा दावा परिणय फुके यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “काही एजंट्स राईस मिलच्या कार्यालयात गेले होते. तिथे यासंदर्भातील प्रश्न विधानसभेत लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल, अशा धमक्या देण्यात आल्या. त्याची व्हिडीओ क्लिपदेखील माझ्याकडे आहे. यासंदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिली आहे,” असे देखील मत परिणय फुके यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगेश कदम म्हणाले की, “कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते व एजंट असा गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुठलीही हलगर्जी सहन करणार नाही. हे लोक कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.” असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहे.
संजय राऊत यांची जोरदार टीका
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ महायुतीच्या जाहीरनाम्यात दोन प्रमुख घोषणा आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर शेतकऱ्यांना कर्ज माफी या घोषणा आहेत. त्याचं तुम्ही काय करणार याचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालं पाहिजे. आठ लाख हजार कोटीच्या वरच कर्ज हा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात? शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणी केली होती?. शक्तीपीठ मार्गाची मागणी गेल्या काही वर्षात ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले गेले. त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले. टेंडर देण्यात आले. ते पैसे निवडणुकीचत वापरले असतील किंवा आमदार खरेदीसाठी वापरले असावेत” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.