Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Birthday : पियूष गोयलांचा ‘सेवा’चा संकल्प; उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रांसह ओपन जिमची घोषणा

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांनी मतदारसंघात विविध सेवा उपक्रम राबवले. 100 सुविधा केंद्रे, ओपन जिम, रक्तदान शिबिर आणि विकासकामांच्या उद्घाटनाची घोषणा यावेळी करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Sep 17, 2026 | 09:00 PM
पियूष गोयलांचा ‘सेवा’चा संकल्प; उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रांसह ओपन जिमची घोषणा

पियूष गोयलांचा ‘सेवा’चा संकल्प; उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रांसह ओपन जिमची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रे उभारण्याची पियूष गोयलांची घोषणा.
  • स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि परवडणारी लॉन्ड्री सेवा मिळणार.
  • नागरिकांच्या आरोग्यासाठी मतदारसंघात ओपन जिम उभारण्याची योजना
 

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी मतदारसंघात विविध सेवा आणि विकासकामांना वेग दिला. महिला सक्षमीकरणापासून नागरी सुविधा, आरोग्य, रक्तदान आणि युवा उद्योजकांशी संवाद अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.

चारकोपमधील ‘प्रगतीचा दिया’ वेल्फेअर सेंटरला भेट देत गोयल यांनी महिला लाभार्थींशी संवाद साधला. महिलांच्या अडचणी, त्यांचे अनुभव आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेत त्यांनी कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष फायदा किती मिळतोय, याची माहिती घेतली.

यानंतर कांदिवलीतील दुर्गा साई एसआरए परिसरात त्यांनी लाभार्थी कुटुंबांच्या घरांना भेटी दिल्या. विकासकामं कागदावर न राहता ती थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजेत, असा संदेश यावेळी गोयल यांनी दिला.

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

दरम्यान, उत्तर मुंबईतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. लवकरच 100 सुविधा केंद्रे सुरू करण्यात येणार असून, या केंद्रांमध्ये स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि परवडणाऱ्या दरात लॉन्ड्री सेवा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. विशेषतः या सुविधांची गरज असलेल्या वस्त्या आणि समुदायांमध्ये त्याचा फायदा होणार आहे.

याशिवाय उत्तर मुंबईत ओपन जिम उभारण्याची योजनाही गोयल यांनी जाहीर केली. युवक, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांना जवळच्या परिसरात व्यायामाची सुविधा मिळावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरालाही गोयल यांनी भेट दिली. रक्तदात्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांनी कौतुक केले.

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

बोरीवलीतील कल्पना चावला चौक, सरदार वल्लभभाई चौक आणि चिकुवाडी जॉगर्स पार्क येथील विकासकामांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. तसेच वीर सावरकर मैदानावर आयोजित पारणा समारंभात त्यांनी सहभाग घेतला.

दिवसभराच्या दौऱ्यात गोयल यांनी बोरीवली आणि दहिसरमधील गणपती मंडपांनाही भेट दिली. यावेळी त्यांनी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायाच्या कल्पना आणि प्रवासाबाबत चर्चा केली. एकूणच, मोदींच्या वाढदिवसानिमित्त उत्तर मुंबईत सेवा, नागरी सुविधा, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.

Web Title: Pm modi birthday piyush goyal 100 suvidha kendra open gym north mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Piyush Goyal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
1

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
2

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
3

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Amit Shah -Eknath Shinde Meeting:  अमित शाहांची पुन्हा एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक; भाजपच्या गोटात अस्वस्थता
4

Amit Shah -Eknath Shinde Meeting: अमित शाहांची पुन्हा एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक; भाजपच्या गोटात अस्वस्थता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.