Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bachchu Kadu Food Boycott : शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक; रायगडाच्या पायथ्याला करणार अन्नत्याग आंदोलन

राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याची टीका विरोधक करत आहेत. यामुळे प्रहार संघटनेचे बच्चू कडू रायगडावर अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 20, 2025 | 03:25 PM
Prahar leader Bachchu Kadu holds food boycott protest at Raigad for farmers' issues

Prahar leader Bachchu Kadu holds food boycott protest at Raigad for farmers' issues

Follow Us
Close
Follow Us:

रायगड : प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.  प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्यापासून प्रहार संघटना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. आंदोलनाची घोषणा बच्चू कडू यांनी केली असून यामुळे राज्य सरकारपुढे आणखी अडचणी वाढणार आहेत.

उद्यापासून (दि. २१ मार्च)पासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. पुढील तीन दिवस हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच २३ मार्च शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी हे आंदोलन होईल,अशी माहिती संयोजक सचिन साळुंखे व ओंकार साळुंखे यांनी दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय आहेत मागण्या?

प्रहार संघटनेचे संयोजक सचिन साळुंखे म्हणाले, “शुक्रवार, दि. २१ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून प्रहार नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन सुरु होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. दिव्यांगांना, कर्जमाफी, त्यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन, स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी, दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे.” अशी माहिती प्रहार संघटनेचे संयोजक सचिन साळुंखे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बच्चू कडूंनी नाना पटोलेंना सुनावले

‘बुरा नो मानो होली है’ म्हणत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी निशाणा साधला होता. तसेच कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आमच्यासोबत युती करा अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद देतो अशी ऑफर देखील नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिली. यावर आता बच्चू कडू यांनी कॉंग्रेस नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. बच्चू कडू म्हणाले की, नानाभाऊंची ही ऑफरच मोठी हास्यास्पद आहे. काँग्रेसच सध्या स्थिर आहे की नाही हे समजत नाही. काँग्रेसचे 20 आमदार आहेत, तर एक तर आताच शिंदे गटात गेले आहेत. नाना पटोले यांची ऑफर चांगली आहे. पण त्यांनी काँग्रेस कुठंय ते शोधलं पाहिजे असा खोचक टोला बच्चू क़डू यांनी नाना पटोले यांना लगावला.

Web Title: Prahar leader bachchu kadu holds food boycott protest at raigad for farmers issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • Bacchu Kadu

संबंधित बातम्या

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…
1

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा
2

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा
3

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा

Kadu VS Bawankule : बच्चू कडू आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी करतात…; चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा डिवचले
4

Kadu VS Bawankule : बच्चू कडू आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी करतात…; चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा डिवचले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.