Prahar leader Bachchu Kadu Disqualified from the post of chairman of Amravati District Bank
अमरावती : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे राजकारण रंगले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यामधील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे. अजित पवार गटाचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडसोबत अर्थिक संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देखील नाकारण्यात आले असून त्यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यावर आता प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
माजी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. बच्चू कडू म्हणाले की, ‘मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्घृण हत्या झाली आणि एवढं सगळं होऊन राजकारणी लोकांनी त्यावर राजकारण केलं आहे. खरं तर हा दोन जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे. ज्या प्रमाणे संतोष देशमुखची हत्या झाली ती कशा प्रकारे झाली? ते कुठल्या प्रवृत्तीचे लोक होते? त्यांची जात कोणती होती? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांची जी प्रवृत्ती होती ती फार मला असे वाटते की एखाद्या दुश्मनाच्याही म्हणजे कुठल्या औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य करून ठेवले आहे.’ असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे बच्चू कडू म्हणाले की, अशा प्रवृत्तीला ठेचण्यासाठी तुम्हाला इतकी वर्ष लागतात. ती प्रवृत्ती वाढली कशी? कोणी खतपाणी घातले? ही जबाबदारी तिथल्या पोलिस प्रशासनाची नाही का? हे सगळं कसं आहे डोंगर मोठा झाल्यानंतर आता तुम्ही उंदराची चाल चलत आहात. वास्तविक याच्यामध्ये हे सगळं हत्या झाली म्हणून उघडकीस आले. मग एकंदरीत चालू काय होतं बीडमध्ये? कोणाच्या आशिर्वादाने चालू होतं? राजकारण म्हणजे सगळच काही असे समजणारे जे लोक आहेत आणि राजकारणासाठी काही पण, कुठे पण आणि कसे पण करण्याची जी प्रवृत्ती आहे या देशामधील लोकांमध्ये वाढली आहे त्याचे हे मोठं उदाहरण आहे.’ असा घणाघात बच्चू कडू यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशी समितीने दोषारोप पत्र सादर केल्यानंतर समोर आलेले व्हीडीओ पाहण्याची माझ्यात हिंमत नाही. हा अमानवी प्रकार आहे. या संपूर्ण प्रकारावर मी संतोष देशमुखच्या आईची माफी मागते. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे अशा अमानवी घटनांमुळे त्यांच्यावर काय परिणाम झाले असतील हे मी समजू शकते, अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.