Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “फक्त तू ये. धमक्या देऊ नको..”; मनोज जरांगे पाटलांचे धनंजय मुंडेंच्या समर्थकाला सडेतोड उत्तर

मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांच्यावर टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 03, 2026 | 12:41 PM
Manoj Jarange Patil responds to Dhananjay Munde supporter Govind Phad political news

Manoj Jarange Patil responds to Dhananjay Munde supporter Govind Phad political news

Follow Us
Close
Follow Us:

Manoj Jarange Patil : बीड : अजित पवार यांच्या अपघातीनिधनानंतर माजी मंत्री आणि बीडचे आमदार धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे हे सक्रीय राजकारणामध्ये आले असून यामुळे चर्चांना उधाण आले. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे. यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी गेल्या आठवड्यात जरांगे पाटील यांना धमकी दिली होती. आम्ही भाळी भंडारा लावल्याचे थेट इशारा त्यांनी दिला होता.यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्त दिले आहे. गोविंद फड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे पाटील म्हणाले की,”मी माझ्या समाजाला देव मायबाप मानलं आहे. माझी संपत्ती तुम्ही आहे मी आयुष्यात एक रुपया कमविला नाही, माझे मायबाप तुम्ही आहात.मी पण डावावर लागलो. माझे कुटुंब पण डावावर लागलंय. कधी मारून टाकतील मला आणि माझ्या कुटूंबाला तरी मी हटत नाही. मी रात्रंदिवस बाहेर आहे. कोणाला यायचे त्याला येऊ द्या आम्ही समर्थ आहे लढायला मराठे तू कोणत्याही गावात ये राज्यातल्या प्रत्येक गावात माझा मराठा आहे.” असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाबाबत व्यक्त करत गोविंद फड यांच्यावर टीका केली.

हे देखील वाचा : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “फक्त तू ये. धमक्या देऊ नको. यावं करणार आहे त्याव करणार, या धमक्या नको देऊ. काल कुणीतरी म्हणालं, ते धनंजय मुंडे याचं कुणीतरी ते म्हणाले भंडारा लावून मारून टाकतो. तू भंडारा लाव नाहीतर गुलाल काहीही लाव. मी मरायला भीत नाही. माझी कधीपण तयारी आहे. माझा समाज पण सज्ज आहे, असा इशारा त्यांनी फड यांना दिला. का मारायचं तर गरिबांच काम करतो हेच कारण ना. समाजाने एकजुटीने रहा खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जायचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

हे देखील वाचा : जिद्द आणि कष्टातूनच उद्योजक घडतात…: ‘थर्माकोल मॅन’ रामदास माने यांचे प्रतिपादन

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ज्या क्षेत्रात अडचणी आहेत त्या क्षेत्रात सुध्दा मी एक यंत्रणा उभा करायला लागलोय. मी समाजाला सांगितलेले आहे चार पाच दिवसानंतर राज्यभरातील एक वर्षासाठी दौरे पूर्णपणे बंद करणार आहे. तुम्हाला आरक्षण दिलंय चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टेंशन नाही, तुम्हाला आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करतोय. महाराष्ट्रातील कोणत्याही कोनाकोपर्‍यात अडचण आली तर 15 मिनिटात माणूस तुमच्या मदतीला आला पाहिजे.”असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तसेच “ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मोर्चा घेऊन गेलो होतो वाशीला तिथे सांगितले सग्यासोयऱ्यांची अधिसूचना काढली. आता हरकतीची छाननी करेपर्यंत तीन चार महिने लागणार आहेत तोपर्यंत आपण मराठ्यांच्या पोरींना मोफत शिक्षण करू. मी जर जातीवादी असतो ना तर हो फक्त मराठ्याच्याच पोरीला मोफत शिक्षण हवे अशी मागणी केली असती. मी त्यावेळी सांगितले सगळ्या जातीच्या लेकीबाळीना मोफत शिक्षण करा आणि तो जी आर मंजूर करून घेतला. आता आरक्षणाचा पश्चिम महाराष्ट्राचा नंबर आहे मला वाटतंय 7 तारखेपर्यत काय तरी खालीवर करतील, नाही केलं तर मी त्यांच्या मागे लागणार आहे सांगितले आहे” असे देखील मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मत व्यक्त केले.

 

 

Web Title: Manoj jarange patil responds to dhananjay munde supporter govind phad political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Dhnanjay Munde
  • Manoj Jarange
  • Maratha community

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.