
अकोला : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये उपोषणाचे हत्यार उगारले आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणावर नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज पहिल्यांदाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची पोलखोल केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन सरकारला घेरले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन आक्रमक भूमिका घेत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला घेरले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, याला कारणीभूत म्हणजे शेतकरी मूर्ख आहेत. आधीच्या दोन्ही सरकारने म्हटलं होतं की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, मग शेतकऱ्यांनी पुन्हा सत्तेवर कोणाला आणलं? मग आता कशाला रडत बसले?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “शेतामध्ये जे पेरले तेच उगवणार आहे, जे कर्जमाफी करणारं सरकार नाही ते आता सत्तेवर आले, तर ते कर्जमाफी करणार नाहीत असं म्हणत असतो त्यात नवीन काय? ते आता भोगावं लागतं” असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांवर देखील राग व्यक्त करुन कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच महायुती सरकारला घेरले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांची पोलखोल केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा प्रकाश आंबडेकर यांनी पोलखोल केली. “मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले हे जरांगे पाटील वर्सेस सुरेश धस अस धरायचं का? की काय म्हणायचं? जस शेतकरी कर्जमाफीला शेतकरी दोषी आहेत तसेच मराठा आरक्षणाला तुम्ही(जरांगे) दोषी आहात. जे तुम्हाला मान्य करायला तयार नव्हते, त्यांनाच तुम्ही सत्तेवर बसवलं” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलं नाही, आणि बीजेपीला तुम्ही सत्तेवर बसवलं आहे, तीच बीजेपी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हती” असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मागील दोन वर्षापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढून जोरदार आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाज हा कुणबी असून सर्व मराठा समाजाला कुणबी अंतर्गत ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशी मूळ मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात महायुतीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे महायुती सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असे चित्र अनेकदा राज्यामध्ये दिसून येत आहे.