Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का; ‘या’ खासदाराने सोडली ममतांची साथ

राज्यसभा सदस्य सुष्मिता देव यांनीही संसद आणि पक्षातून राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी दिल्लीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय योजनांबद्दलच्या अटकळांना उधाण आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 12, 2026 | 09:09 AM
ममता बॅनर्जी यांना 'ईडी'चा झटका; तृणमूल काँग्रेसची 440 कोटींची खातीच गोठवली

ममता बॅनर्जी यांना 'ईडी'चा झटका; तृणमूल काँग्रेसची 440 कोटींची खातीच गोठवली

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची साथ सोडून तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रकाश चिक बराइक यांनी गुरुवारी पक्ष तसेच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला दिलेल्या जनादेशाच्या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांच्यानंतर या आठवड्यात पक्ष सोडणारे बराइक हे तिसरे तृणमूल खासदार आहेत. सूत्रांनुसार, बराइक यांनी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला. नंतर, भाजपचे नेते निशिकांत दुबे यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना बराईक म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. तृणमूल काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. पश्चिम बंगालच्या जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करत मी पक्षाचा राजीनामा देत आहे. आपल्या राजीनामा पत्रात, बराइक यांनी लिहिले, मी राज्यसभेचा राजीनामा देत आहे. कृपया माझा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारावा.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधून नेत्यांच्या मोठ्या संख्येने होणाऱ्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा आला आहे. सोमवारी, राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांनी वरिष्ठ सभागृहाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद असल्याचे सांगून तृणमूल काँग्रेस सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला.

खासदारांकडून दिला जात आहे राजीनामा

बुधवारी, राज्यसभा सदस्य सुष्मिता देव यांनीही संसद आणि पक्षातून राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी दिल्लीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय योजनांबद्दलच्या अटकळांना उधाण आले आहे.

शत्रुघ्न सिन्हा ममतादीदींसोबत

तृणमूल काँग्रेसमधून (TMC) होणाऱ्या नेत्यांच्या गळतीदरम्यान, खासदार शत्रुघ्न सिन्हा हे देखील बंडखोरी करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती. ते पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती, मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतःच स्पष्ट केले आहे की ते तृणमूल काँग्रेस सोडणार नाहीत.

West Bengal Politics : राज्यसभेत ममता बॅनर्जींना मोठा धक्का? तिसऱ्या राजीनाम्यानंतर TMC ची संख्या १० वर

Web Title: Prakash chik baraik has resigned as a rajya sabha mp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • TMC. Political News
  • West Bengal Politics

संबंधित बातम्या

Mamata Banerjee: ‘हे कसले सरकार जे आपल्याच विद्यार्थ्यांना घाबरते’? दिल्लीतील लाठीमारावरून ममता बॅनर्जींचा थेट हल्ला
1

Mamata Banerjee: ‘हे कसले सरकार जे आपल्याच विद्यार्थ्यांना घाबरते’? दिल्लीतील लाठीमारावरून ममता बॅनर्जींचा थेट हल्ला

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई
2

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.