Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा! आज पंतप्रधान मोदी मुंबईत तर राहुल गांधी कोल्हापूरात

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महायुतीसह महाविकास आघाडी देखील प्रचारासाठी सभा, दौरे करत आहे. आज राज्यामध्ये प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडणार आहे. आज महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 05, 2024 | 08:38 AM
Rahul Gandhi and PM Narendra Modi is on Maharashtra tour

Rahul Gandhi and PM Narendra Modi is on Maharashtra tour

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. नवरात्रीनंतर राज्याच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने या निवडणूकांना सामोरे जात आहे. राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे राजकारण रंगले आहे. पक्षश्रेष्ठींचे राज्यामध्ये दौरे वाढले असून सभा आणि बैठकांचे सत्र वाढले आहे. दरम्यान, आज (दि.05) महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.

मागील आठ दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा महाराष्ट्र पूर्वनियोजित दौरा आहे. मागील आठवड्यांमध्ये ते पुण्यामध्ये मेट्रोच्या उद्घाटनासाठी येणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला. आज (दि.05) पंतप्रधान मोदी हे पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहे. मोदींच्या हस्ते मुंबईत मेट्रो -3 चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  आणि इतर काही विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केलं जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरही जाणार आहेत. नवरात्रीनिमित्त पोहरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर पोहरादेवी या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते 23,300 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या ‘बंजारा विरासत संग्रहालयाचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

त्याचबरोबर आता कॉंग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये असणार आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कसबा- बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्य़ात आली आहे. त्यानंतर राहुल गांधी हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यावेळी राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर राहुल गांधी हे संविधान सन्मान कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांचा काल (दि.04) कोल्हापुरात पूर्वनियोजित दौरा होता. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा कालचा दौरा रद्द झाला. मात्र आज ते कोल्हापुरात येणार आहेत.

विधानसभा निवडणूकीच्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हा महाराष्ट्र दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे सुद्धा दोन वेळा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या निवडणूकीसाठी केंद्रामध्ये सुद्धा जोरदार तयारी आणि खलबतं सुरु असल्याचं स्पष्ट आहे. महायुती व महाविकास आघाडीचा आज प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे स्पष्ट आहे.

Web Title: Prime minister modi in mumbai and rahul gandhi in kolhapur for election campaigning in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 08:38 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.