priya fuke press live sushma aandhare and rohini khadse target bjp
मुंबई : राजकीय नेत्यांच्या सुनांकडून धक्कादायक असे आरोप केले जात असून रोज नवीन नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. परिणय फुके यांच्या भावजई प्रिया फुके यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी खडसे आणि अंधारे यांनी प्रिया फुके यांच्याबाबत ठाम भूमिका मांडली आहे.
प्रिया फुके यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली. रोहिणी खडसे म्हणाल्या की, “प्रिया फुके यांना सर्मथन देण्यासाठी आम्ही आलो, राजकारणाचा विषय नाही, मदतीची अपेक्षा आहे. आम्ही बहिणींसाठी आम्ही आलो आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल होत नाही. सरकारने लाडकी बहीण म्हणून त्यांना मदत करावी, आम्हाला महिला आयोगाकडून अपेक्षा होती. परिणय फुके हे भाजपचे आमदार आहे, एक महिला त्याच्या भावाची पत्नी आहे मुख्यमंत्री यांनी चर्चेतून मार्ग काढावा,” अशी अपेक्षा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या देखील या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होत्या. त्यांनी राजकीय भूमिका मांडली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “महिला आयोग हा पक्षाच्या कामात व्यस्त आहे. पोलिसांवर गंभीर आरोप केले, यात प्रिया फुके यांनी चौकशीसाठी येण्यासाठी अनेक पत्र पाठवले, महिला आयोगाने दखल घेतली नाही. 12 मे रोजी विनयभंगाची तक्रार दिली. यात तक्रारदार याने उलट प्रिया फुकेंवर अॅ्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परिणय फुके हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहे. लोक आदर्श घेत असतात. मुख्यमंत्री यांना विनंती आहे, चौकशीच्या नावावर होणारा त्रास थांबवावा, अजित पवार यांनी प्रिया फुके यांना चिल्लर न समजावता, पक्षाकडे असलेल्या महिला आयोगाकडे लक्ष द्यावे,” असा घणाघात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या की, “प्रिया फुके यांना रात्री बाहेर काढून घरातून हाकलले, धमकी दिली आहे. आपल्याकडे हिंदू विवाह कायद्यानुसार संपतीवर अधिकार असतो, संकेत फुके यांचा मृत्यू आजाराने झाला आहे, त्यामुळे सुनेने संपत्ती मागणे हे स्वभाविक आहे. त्यांचा एक मुलगा 10 वर्षाचा तर दुसरा आठ वर्षांचा आहे. मागील दीड वर्षांपासून ती आईच्या घरात राहते. हा राजकीय स्टंट नाही, माझ्या पतीला भाजप कडून नगरसेवक तिकीट द्या किंवा मला पैसे द्या असे कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्र्यांना यांना प्रिया फुके चार वेळा भेटली. सांमजस्याची बाजू ही महिला आयोगाची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याबाबत देखील मत मांडले आहे. “या बाई सोयीनुसार पलटतात. या बाई हगवणे व इतर प्रकरणात तत्परतेने का घेत नाही. चाकणकराची पाठराखण करण्यासाठी सुनील तटकरे तत्परतेने पुढे आले. आणि क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला. सुनील तटकरेंनी चाकणकर यांच्या बद्दल दाखवलेली तत्परता हगवणे कुटुंबियांना भेटण्याबद्दल दाखवायची होती. तीच तत्परता संजय शिरसाट यांच्या प्रकरणात घेऊन ती महिला स्वतःहून माघार घेतली की त्याच्यावर दबाव टाकला याबद्दल घ्यावी होती. सिलेक्टिवपणा का तुमचा पक्षपातीपणा यावर आमचा खरा आक्षेप आहे,” अशी भूमिका सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी घेतली आहे.